वीरशैव लिंगायत चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने लिंगायत समाजातील ७ जणांना प्रत्येकी ५० हजाराचे अर्थसहाय्य 

वीरशैव लिंगायत चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने लिंगायत समाजातील ७ जणांना प्रत्येकी ५० हजाराचे अर्थसहाय्य 



उदगीर ( प्रतिनीधी ) - उदगीर येथील वीरशैव लिंगायत चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने श्री क्षेत्र महादेव मंदिर, विकास, नगरचे अध्यक्ष तथा उदगीर तालुका बसव अनुभव मंटपचे सचिव श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थानी सहकार महर्षी चंद्रकांत वैजापूरे,  सुभाष धनुरे,  बाबुराव समगे, कृ. उ. बा. चे सभापती सिध्देश्‍वर (मुन्ना)पाटील व सेवानिवृत्त पोलिस सहाय्यक फौजदार राजकुमार बिरादार बामणीकर यांच्या उपस्थितीत लिंगायत समाजील ७ जणांना स्वावलंब जिवण जगण्यासाठी बिनव्याजी परतीच्या अटीवर प्रत्येकी ५० हजाराचे अर्थसहाय्य देण्यात आले.
उदगीर तालुक्यातील लिंगायत समाजातील गोरगरीब लोकांना स्वतःच्या पायावर उभा टाकण्यासाठी व स्वलंबण जिवण जगावे यासाठी व्यवसाय, शिक्षण पूर्ण करण्यासाठी, मुला -मुलींच्या लग्नासाठी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो यासाठी कर्जबाजारी व्हावे लागते किंवा व्याजी हजारो रुपये काढावे लागते. यासाठी उदगीर येथील वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष तथा सहकारमहर्षी चंद्रकांत वैजापूरे यांनी पुढाकार घेऊन वीरशैव चॅरीटेबल ट्रस्टची स्थापना केली. या द्रस्टच्या वतीने लिंगायत रसमाजातील उदगीर तालुक्यातील  बामणी, लोहारा, कडखेल, धोंडिप्परगा,शिरोळ जानापूर आदी ग्रामीण भागातील आता पर्यत जवळ जवळ शेकडोच्या वर लोकांना आर्थिक मदत बिनव्याज परतीच्या अटीवर करणयात आली आहे.
आज दि. ३ जून २०२० रोजी श्री क्षेत्र महादेव मंदिर, विकास, नगरचे अध्यक्ष तथा उदगीर तालुका बसव अनुभव मंटपचे सचिव श्रीकांत पाटील यांच्या निवासस्थानी वीरशैव लिंगायत चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने लिंगायत समाजील गरजूंना अर्थसहाय्य करण्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर ट्रस्टच्या वतीने यापूर्वी ४ जणांना ५० हजार अर्थसहाय्य देण्यात आले होते ही रक्कम त्यांनी स्वतः व्याजासह पूर्ण रक्कम ट्रस्टला परत केली जेणेकरून मुळ रक्कमेसह व्याज दिल्यास त्यातील एखाद्या कुटुंबाची अडचणी भागू शकते त्यांचा आदर्श लिंगायत समाजातील सर्वांना घ्यावा व पूर्णपणे स्वालंबी झाल्यानंतर घेतलेली रक्कम परत करावी यासाठी या ४ जाणांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व नवीन ७ जणांना मान्यवर, पत्रकारांच्या हस्ते  प्रत्येकी ५० हजाराचे चेक असे एकूण ३.५० लाख रूपय वाटप करणयात आले. 
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा. सिध्देश्वर पटणे यांनी केले तर आभार श्री क्षेत्र महादेव मंदिर, विकास, नगरचे अध्यक्ष तथा उदगीर तालुका बसव अनुभव मंटपचे सचिव श्रीकांत पाटील यांनी मानले. यावेळी बाबुराव पाढंरे,सेवानिवृत्त पोलिस सहाय्यक फौजदार राजकुमार बिरादार बामणीकर, रमाकांत चटनाळे, प्रा.प्रदीप वीरकपाळे, ऍड.सुनील रासुरे, राम मोतीपळे, शुभम चणगे, पप्पू डांगे, पत्रकार रवि हसरगुंडे, राम मोतीपवळे, विनोद मिंचे,महादेव घोणे, शिवराज पाटील, श्रीमती विमलताई गर्जे,रमेश खंडोमलके,हरिशचंद्र वट्टमवार,उमाकांत सुदांळे,बालाजी जलमपुरे,माधव बिरादार चिघळीकर,वसंत शिरसे, सतीश उस्तुरे,कल्याण बिरादार,विठ्ठलराव मुंडे,ज्ञानोबा मुंडे,सुयोग निडेबने,कपील शेटकर,धोंडीबा सुगावकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.