नगर परिषदेतील दिव्यांगाचा हक्काचा शासन निर्णय ५% निधी त्वरित वितरण करा - प्रहार जनशक्ती पक्षा

नगर परिषदेतील दिव्यांगाचा हक्काचा शासन निर्णय ५% निधी त्वरित वितरण करा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ठिय्या आदोंलन.



उदगीर - नगर परिषदेतील दिव्यांगाचा हक्काचा शासन निर्णय५% निधीगेल्या वर्षी दिव्यांगाचा शासन निर्णय ५% निधी उदगीर नगर परिषदे ने प्रतिव्यक्ती ६०००/ रुपये मंजुरी करून ३०००/ रुपये देण्यात आले व या चालू वर्षाचा निधी अद्यापही वितरण केलेला नाही तरी आठ दिवसात निधी त्वरित वितरण करावे अन्यथा सर्व दिव्यांग बांधवा सहित मुख्यअधिकारी साहेब न.प.उदगीर यांच्या दालनात ठिय्या आदोंलन करण्यात येईल असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आले.यावेळी मुख्य अधिकारी साहेब यांना निवेदन देताना प्रहार ता.अध्यक्ष विनोद तेलंगे,ता.सहसचिव महादेव आपटे, ता.उपाध्यक्ष संदीप पवार,ता.उपाध्यक्ष महादेव मोतीपवळे, ता सरचिटणीस अविनाश गायकवाड, दिव्यांग बांधव सचिन काबळे,गणेश काबळे,परागबाई गायकवाड, संदीप सुर्यवंशी, संतोष बोराळकर,खलील सर,व इतर प्रहार सेवक यांच्या उपस्थितीथ निवेदन देण्यात आले.