वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचे सुशोभीकरणासाठी बोअर मारून उद्घाटन

  वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचे सुशोभीकरणासाठी बोअर मारून उद्घाटन



उदगीर ( प्रतिनिधी ) -उदगीर येथील समाजाच्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकात वैजापुरे यांनी पुढाकार घेतले व या स्मशानभूमीत झाडे लावण्यासाठी व्यवस्था तसेच बैठकीसाठी बँच व येणाऱ्या नागरिकांना थांबण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था असे सर्व सोयी सुविधा करण्यात आली आहे. 


आज दि. १४ जून २०२० रोजी सहकारमहर्षी तथा वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे यांच्या उपस्थितीत बोअर मारून उद्घाटन करण्यात आले. यावेळी न.प. मुख्याधिकारी भरत राठोड,सुभाष धनुरे,बाबुराव पाढंरे,साईनाथ चिमेगावे,रमाकांत चटनाळे,भरत करेप्पा,रामभाऊ मोतीपवळे, रविंद्र हसरगुंडे चंदरअण्णा प्रतिष्टाणचे संस्थांपक अध्यक्ष श्रीकांत पाटील उपस्थित होते.