*.
[ ] वेदनाग्रस्त माणसांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी सामाजिक भान असणाऱ्या कांही संवेदनशील मनाच्या ध्येयवेड्या व्यक्ती व संस्था करुणाप्रेरित होऊन करित असलेल्या प्रेरणादायी सामाजिक कार्याच्या संकलित नोंदी म्हणजे कार्यप्रेरणा होय असे मत मयुरी सुवर्णकार हिने व्यक्त केले. [ ] मयुरीची आई सौ.महानंदा बालाजी सुवर्णकार यांचे अध्यक्षतेखाली चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत संपन्न झालेल्या 219 व्या वाचक संवादांमध्ये कु.मयुरी महानंदा बालाजी सुवर्णकार हिने भूजंग चव्हाण व प्रकाश पाटील लिखित कार्यप्रेरणा या साहित्यकृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाली की, आज अनेक व्यक्ती व संस्था समाजामध्ये व्यापक स्वरुपाची सामाजिक कार्ये करीत आहेत.अशा पवित्र आणि स्वयंप्रेरित समाजसेवकांबद्दल आनेकांच्यामनात त्यांच्या कार्याची प्रेरणा निर्माण होऊन समाजभान जागे झाले पाहिजे यासाठी हि कार्यप्रेरणा महत्त्वाची आहे असेही ती म्हणाली. [ ] यानंतर संपन्न झालेल्या चर्चेमध्ये अनेकांनी सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथभेट देण्यात आली. शेवटी महानंदा सुवर्णकार यांनी सुंदरअसा अध्यक्षिय समारोप केला.
[ ] या वाचक संवादचे प्रास्तविक कु.ऋतुजा पाटील हिने मांडले तर अत्यंत प्रभावी सूत्रसंचालन कु. प्रतिक्षा लोहकरे हिनी केले शेवटी मयुरीचे वडिल बालाजी सुवर्णकार यांनी आभार मानले .