उदगीर आगाराचे वाहतूक नियंत्रक बालाजी(सचिन) पटवारी यांना धमकी देणार्‍या ट्रॅव्हलस मालकविरूध्द गुन्हा दाखल


उदगीर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी खाजगी वाहनधारकांना परवानगी नाही. सध्या परीवहन महामंडळाच्या बसेस अंतरजिल्हा चालू आहेत.पण पुणे,मुंबई सारख्या ठिकाणी जाण्यसाठी खाजगी वाहनाशिवाय पर्याय नाही त्यामुळे पास घेणे गरजेचे आहे व शासनाच्या नियमाप्रमाणे ट्रॅव्हल्सना वाहतूकीस परवानगी नाही यामुळे खाजगी वाहनावर सध्या शासनाची करडी नजर आहे व खाजगी ट्रॅव्हल्स सध्या प्रवशांची लूट करत असून तिकीटाच्या चौपट दर लावून घेऊन जात आहेत. पण उदगीरमधून कांही ट्रॅव्हल्सवाले शासनाच्या विनापरवाना जाता दर आकाररून रात्रीच्या वेळी शसानातील कांही लोकांशी संगणमत करून जिल्ह्याच्या बाहेर जात आहेत.


असाच प्रकार दि. १५ जून २०२० रोजी एका खाजगी ट्रॅव्हलसच्या मालकाने शासनाची परवानगी न घेता नियमापेक्षा जास्त प्रवाशी भरून मुंबई-पुणेकडे रात्रीच्या वेळी प्रशसानाची नजर चुकवून जात असताना कांही पत्रकार व उदगीर आगाराचे वाहतूक नियंत्रक बालाजी(सचिन) पटवारी व त्यांच्या सहकाऱ्याना माहिती मिळताच पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने उदगीर शहराच्या हद्दीतच नळेगाव रोडवर आडवली होती. त्यामुळे त्या ट्रॅव्हल्स मालकाने मनात राग धरून काल दि.२४ जून २०२० रोजी वाहतूक नियंत्रक बालाजी(सचिन) पटवारी हे उदगीर आगार बसस्थानक डेपो येथे कर्तव्यावर असताना सायंकाळी ०६.१७ वाजता प्रदीप भांजे व त्याच्या सोबत एक अनोखी व्यक्ती या दोघांनी मिळून तू आमची ट्रॅव्हल्स पकडलास तू बाहेर तूला दाखवतो व तुझा सोबत तुझ्या सोबतचे आगारातील कर्मचारी व त्या पोलिसवाल्यांनाही बघुन घेतो असे म्हणून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे दै. एकुजूट लोकजागृतीशी बोलताना बालाजी ( सचिन )पटवारी यांनी सांगातले. यानंतर तात्काळ वाहतूक नियंत्रक बालाजी पटवारी यांनी उदगीर शहर पोलिस स्टेशन येथे सदील आरोपीविरूध्द तक्रार दिली. तरी त्यांच्या विरूध्द एन.सी.आर. नं.१७४/२०२० कलम ५०४,५०६,३४ भादवी दंड संक्षिता १८६० प्रमाणे दाखल अमलदार एनसीपी/९३१ नागरगोजे व तपास अधिकारी नापोका.३०७ यांनी एन.सी. दाखल केले आहे.