अखेर अक्षरनंदन हायस्कूल उदगीरवर गुन्हा दाखल
केंद्र व राज्य सरकारने शाळा सुरु करण्यास अद्यापही परवानगी दिलेली नाही. मात्र शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत उदगीरात एका शाळेत नियम तोडून विद्यार्थ्यांचे वर्ग भरवल्याची घटना उघडकीस आली आहे. याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले होते, आज संबंधित शाळेवर गुन्हा दाखल होणार असल्याचे सागितले.
उदगीर येथील नळेगाव रोडवर असलेल्या अक्षरनंदन मराठी शाळेत गेल्या चार दिवसापासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत याबाबत शिक्षण विभाग व प्रशासन अनभिज्ञ होते. येथील काही पत्रकारांना याची माहिती समजल्यानंतर त्यांनी सोमवारी दि.२२ या शाळेवर जाऊन पाहणी केली असता विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असल्याचेे निदर्शनास आले होते. शाळेत वर्ग सुरु असल्याचे फोटो आणि व्हिडिओ फुटेज घेऊन ते प्रशासनास पाठवले होते संबंधित शाळेवर आता कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत येथील अक्षरनंदन शाळेत बिनदिक्कतपणे विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
याची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गंभीर दखल घेतली असून चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वसन त्यांनी दिले होते, मंगळवारी लातूरचे उपशिक्षणाधिकारी मोरे यांनी संबंधित शाळेची चौकशी केली व अहवाल लातूर येथील माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना देण्यास आला असून, प्रथम दर्शनी शाळा दोषी दिसत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार यानी शाळेची पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास असे आले की दि.१८ ते २१ जून २०२० पर्यंत संस्थेने जिल्हाधिकारी,लातूर यांच्या आदेश जा.क्र.२०२०/एमएजी /कक्ष-१/कावी-८१६ दि. ३१.०५.२०२० अनवये मुद्दा क्रं. १) विद्यालय,महाविद्यालय,शिक्षण/प्रशिक्षण/शिकवणी/ संस्था या बाबाींना मनाई असताना सुध्दा अक्षरनंदन हायस्कूल उदगीर येथे प्रतिवदस २० विद्यार्थी एकत्र जमवून आदेशाचे उल्लेघंन केल्याचे दिसून आले म्हणून काल रात्री २३६/२०२० कलम १८८,३४ भादवी,कलम ३ साथ रोग प्रतिबंध कायदा १८९७, सह नियम ११ महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाय योजना २०२० प्रमाणे व्यवसाय मंडळ अधिकारी शंकर हरीदासराव जाधव व तहसीलदार कार्यालय,उदगीर यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस स्टेशन,उदगीर येथे मुख्याध्यापक मारोती तुकाराम बिरादार,रा.कोनाळी,ता.देवणी,अक्षरनंदन हायस्कूल,उदगीरचे अध्यक्ष व सचिव यांच्यावर काल दि. २३ जून २०२० रोजी रात्री ७.४४ वा. पोना १२८७ मिटकरी ,पो.स्टेउदगीर ग्रामीण यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. यापुढील कार्यवाही तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक पल्लेवाड यांच्या सोपवण्यात आला आहे.