लिंबोटी धरणाच्या कामाला गती मिळत नसल्यामुळे, 31 डिसेंबर 2020 पर्यंत उदगीर कराना पाणी मिळणार का.?
उदगीर( प्रतिनिधी)- उदगीरच्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी डोकेदुखी मिटविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने अमृत अटल योजनेतून लिंबोटी धरणाचे पाणी देण्याचे ठरवले. या योजनेचे पाणी 31 डिसेंबर 2019 पर्यंत मिळणार असल्याचे सांगितले होते. परंतु आता जून 2020 सुरू झाले, तरी परंतु अध्याप पावेतो या कामाला गती मिळत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. खरे पाहता अमृत योजना ही लागू होऊन दोन वर्षाच्या वर झालेले आहे. सुरुवातीला या योजनेच्या कामाला सुरुवात झाली. त्यावेळी नगरपरिषदेच्या सन्मानीय, सदस्य मंडळी यांच्यात टेंडर वरून वाद निर्माण झाला. हा वाद प्रशासनाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचला. या टेंडर वरून बरेच महिणे वादात निघुन गेले. त्यामुळे कामाला गती मिळालेली नाही. त्यानंतर कामाला सुरुवात झाली. त्यावेळी तत्कालीन नांदेड जिल्ह्याचे आमदार चिखलीकर यांनी लिंबोटी धरणाचे एक थेंबही पाणी घेऊ देणार नाही, असे सांगितल्यामुळे यामध्ये पण वादात बरेच महिने निघून गेले. त्यानंतर सन्माननीय, चिखलीकर साहेब हे परत निवडून आल्यानंतर त्यांच्याच पक्षातील वरिष्ठ राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला. परत कामाला सुरुवात झाली. हे काम चालू असताना उदगीर शहरातील अंतर्गत पाईपलाईनचे काम पण सुरू झाले. सुरुवातीला या कामाला गती मिळाली. आणि उदगीर शहरात सर्वत्र अंतर्गत पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर मधेच हे काम मंदावले. योगायोगाने कित्येक वर्षानंतर उदगीरला मंत्रीपद मिळाले. महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून संजय भाऊ बनसोडे हे मंत्री पण झाले. त्यामुळे उदगीर करांच्या आनंदात भर पडला.पाणीपुरवठा हे त्यांच्याकडे असल्यामुळे, उदगीर करांना लिंबोटी धरणाचे पाणी मिळणार यात काही शंका नसल्याचे स्पष्ट झाले. व तसे लिंबोटी धरणाचे पाणी मिळण्यासंबंधी नामदार संजयभाऊ बनसोडे यांनी संकेत पण दिले. तरी परंतु सध्या जीवन प्राधिकरण यांच्या वतीने कामाला गती मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आज उदगीर करांना आठवड्याला एकदा पाणी मिळत आहे. त्यामुळे उदगीरच्या नागरिकासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा वरचेवर गंभीर होत आहे. सध्याचे लिंबोटी धरणाचे अमृत योजनेचे काम व्हावे तसे गतीने दिसून येत नाही. त्यामुळे लिंबोटी धरणाचे पाणी उदगीरकरांच्या नशिबी 31 डिसेंबर 2020 पर्यंत होईल का नाही यात शंका होत आहे. उदगीर जळकोट विधानसभेचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार संजयभाऊ बनसोडे यांच्याकडे उदगीरच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे. कुठल्याही परिस्थितीत 31 डिसेंबर 2020 पर्यंत किंवा त्या अगोदर उदगीरच्या नागरिकांना लिंबोटी धरणाचे पाणी मिळण्यासाठी संजय भाऊनी तात्काळ प्रयत्न करावे, अशी उदगीरच्या नागरिकांची मागणी आहे. या शहराच्या अंतर्गत पाईपलाईनसाठी सर्व गल्लीबोळातील रोड खोदल्यामुळे नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना, व महिलांना पाई चालणे व नागरिकांना वाहन चालवणे अवघड होऊन बसलेले आहे. जर लिंबोटी धरणाचे पाणी उदगीरकराना लवकरात लवकर मिळाल्यास, उदगीर शहरातील सर्वच अंतर्गत रोडचे काम पण होणार आहे. आता नामदार संजयभाऊ बनसोडे यांच्याकडे लिंबोटी धरणाचे पाणी उदगीरकरांना मिळण्यासाठी उदगीर करांचे लक्ष लागून आहे.