लातूर 128 पैकी 104 निगेटिव्ह 15 पॉझिटिव्ह पैकी उदगीर येथील 02 व रावणगांव O1 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर09 Inconclusive
विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे एकूण 68 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 55 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून , 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 03 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले आहेत.
पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 04 व्यक्ती वाल्मिकी नगर लातूर येथील आहेत व माऊली नगर, विठ्ठल नगर, विवेकानंद चौक, आझाद चौक, एम. आय. डी. सी. लातूर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे व सारोळा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील एकूण 21रूणाचे स्वॅब तपासण्यासाठी गेले होते. यात नई आबाद येथील मृत्त रूणांच्या कुटुंबातील 02 पॉझेटिव्ह तर याच कुंटुबातील 0 1 तर समर्थ कॉलनीतील एक रुग्ण पुन्हा दुसऱ्यांदा Inconclusive आले आहे. तसेच रावणगांव येथील एका पॉझेटिव्ह रुग्णाच्या कुंटुबातील 01 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर एक व्यक्ती Inconclusive आहे.
अहमदपूर येथिल 02 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या निवासी डॉक्टराच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तीच्या स्वबची तपासणी केली असता त्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत ही आनंदाची बाब आहे.
.