शेतकऱ्यांच्या उगवन न झालेल्या बियाणापोटी महाबिज चे  110.70 क्विंटल बियाणे वाटप 

शेतकऱ्यांच्या उगवन न झालेल्या बियाणापोटी महाबिज चे 


110.70 क्विंटल बियाणे वाटप 


  लातूर,दि.26(जिमाका):- जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात पेरणी केलेल्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्‍या एकूण बियाणापैकी उगवन न झालेल्या बिायाणाबाबत ज्या शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी आहेत. अशा शेतकऱ्यांच्या पिकांची तालुकस्तरीय समितीकडून पाहणी करून ज्या-ज्या शेतकऱ्यांच्या बियाणांची उगवन झालेली नाही त्यांना महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून (महाबिज) आतापर्यंत 110.70क्विंटल बियाणे बदलून देण्यात आलेले आहे.


      तसेच उर्वरित शेतकऱ्यांच्याही लेखी तक्रारी आल्यास त्यांची तालुकस्तरीय समितीकडून पाहणी करून त्या-त्या शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात येईल,असे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबिज) लातूर यांच्याकडून कळविण्यात आले असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.


                 *****