*किनी यल्लादेवी ता. उदगीर येथे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या कडुन पाहणी*
उदगीर तालुक्यातील मौजे किनी यल्लादेवी ता. उदगीर येथे कोरोना रूग्ण आढळून आल्याने राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तातडीने गावास भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला.
तसेच यावेळी आरोग्य, पोलीस, महसुल प्रशासनाला सूचना देऊन या पुढे प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे निर्देश दिले आहेत.
तसेच यावेळी उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी निटुरे, तालुका अध्यक्ष प्रा.शिवाजी मूळे, ता. अध्यक्ष कल्याणजी पाटील, उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, सपोनी बाळासाहेब नरवटे, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मारलापल्ले, प्रा. श्याम डावळे, ज्ञानेश्वर पाटील, सुनील केंद्रे, यांच्या सह सरंपच, उपसरपंच संतोष बिरादार, वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आशावर्कर्स, अंगणवाडी सेविका, उपस्थित होते.
यावेळी कंटेनमेंट झोन मधील नागरीकांनी दक्षता घ्यावी व त्यांना लागणारे जीवनआवश्यक वस्तूंचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावे. असे प्रशासनास निर्देश दिले.
तसेच कंटेनमेंट झोन मधील नागरिकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन अडी अडचणी जाणून घेतल्या. व त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले. व आशा वर्क, आरोग्य कर्मचारी यांची राज्यमंत्री बनसोडे यांनी आस्थेने विचारपूस केली.