मुजीबभाई हाशमी मित्र मंडळातर्फे ४०० कुटुंबांना मदत
उदगीर/प्रतिनिधी-कोरोनामुळे लाॅक डाउन लावण्यात आला. यामुळे अनेक गोरगरिब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असुन गरजू कुटुंबांच्या मदतीला मुजीबभाई हाशमी मित्र मंडळा धावुन आले. जवळपास ४०० कुटुंबांना अन्नधान्याची किट तयार करुन वाटप करण्यात आली आहे. किल्ला गल्ली औरंगपुरा, गंवडी गल्ली, कुंभार गल्लीसह व शहर परिसरातील गरजुना धान्याची किट देण्यात आली आहे.
मुजीबभाई हशमी मित्र मंडळ तथा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते मुजीब हाशमी व त्यांच्या सहकार्यांनी गेल्या पाच ते सहा दिवसात उदगीर शहरातील गरिब कुटुंबाना पाच किलो तांदुळ, तेल पॅकिट, साखर, चन्नादाळ एक- एक किलो, चहा पत्ती व सुका मेवा आदी जिवन अवश्यक वस्तुचे किट तयार करुन वाटप करण्यात करण्यात आले. सामाजिक एकोपा जोपासत मित्र मंडळच्या गरिब व लाॅक डाउन मुळे अडचणीत सापडलेल्या गरजवंत कुटुंबाना अन्नधान्याचे ४०० किट वाटप केले.
लाॅक डाउन काळात शासनाचे सर्व नियमाचे पालण करीत. गोरगरिब जनतेच्या मित्र मंडळाचे हाशमी उबेद, हाशमी अलत्मश, हाशमी शोयब, हाशमी अदनान, हाशमी बशी, हाशमी अब्दुल हाकीब, शकीलभाई हाशमी, सल्लावुद्दीन राजा पटेल, शेख अशफाक आदीनी हे किट गरजु लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले. मुजीबभाई हाशमी मित्र मंडळाच्या वतीने धर्मनिरपेक्ष मदत केल्यामुळे अनेक कुटुंबानी त्यांचे आभार मानले.