मुख्याधिकारी भरत राठोड यांनी जबाबदारी घेऊन त्या कॅन्सरग्रस्त मृत महिलेचा केला विधिवत अंत्यसंस्कार

मुख्याधिकारी भरत राठोड यांनी जबाबदारी घेऊन त्या कॅन्सरग्रस्त मृत महिलेचा केला विधिवत अंत्यसंस्कार


 


उदगीर -शहरातील एका कॅन्सरग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणाल बागबंदे यांनी  मुख्याधिकारी भारत राठोड यांना  तात्काळ संपर्क साधला असता त्या महिलेचा विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
उदगीर येथील कुनेकरी गल्ली च्या बाजूला शंकरलिंग मठाच्या मागील बाजूस एक महिला अनेक वर्षांपासून कॅन्सरने ग्रस्त होती. शनिवारी पहाटे चारच्या सुमारास तिचा मृत्यु झाला तिच्या पश्चात घरात दोन मुले आहेत. कोरोनाच्या रोगाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी परिसरातील कोणी पुढे येत नव्हते. सदरील घटनेची माहिती त्या भागातील सामाजिक युवक नेते कुणाल किरण बागबंदे यांनी पुढाकार घेऊन उपजिल्हाधिकारी डॉ. प्रवीण मगशेट्टी व मुख्याधिकारी भारत राठोड यांना दिली सदरील घटनेची माहीती मिळताच लागलीच तत्परतेने  न.प. चे मुख्याधिकारी राठोड यांनी आपले कर्तव्य पार पाडत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतः घटनास्थळी आपल्या नगर परिषदेच्या कर्मचारी विशाल आलटे , मल्लिकार्जुन हलकुंडे, गुंडरे व  राजू चामले व इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दाखल झाले. सदरील महिलेच्या प्रेताचे मेडिकल चेकअप व दवाखान्या बाबत सर्व मागील पार्श्वभूमी अवगत झाल्यावर अंबुलन्सची  सोय केली व सदरील महिलेवर सार्वजनिक स्मश्यानभूमीत विधिवत अंत्यसंस्कार पूर्ण केले. यावेळी दिनेश अंबेसंगे, दिलीप अनकल्ले, बलभीम अनकल्ले , श्रीकांत पांढरे यांची उपस्थिती होती.
यापूर्वी कोरोना ग्रस्त महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील मुख्याधिकारी राठोड यांनी पुढाकार घेतला होता. त्या प्रसंगातील अनुभव त्यांनी व्यक्त केले आहेत. मुख्याधिकारी राठोड यांच्या कार्यतत्परतेचे व संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.