कुंचल्याचे किमयागार* *चित्रकार अमृता शेरगील*
*भारतीय चित्रकलेला एक नवी दिशा देणारी थोर चित्रकार अमृता शेरगील
अमृता शेरगील यांचा जन्म 30 जानेवारी 1930 मध्ये बुडापेस्ट हंगेरी येथे अतिशय श्रीमंत घराण्यात झाला. 20 व्या शतकातील ही एक भारतीय महिला महान चित्रकार होती. तिचे वडील उमराव सिंह शेरगील हे शीख धर्मीय होते. ते संस्कृत फारसीचे विद्वान पंडित होते आणि उच्च सरकारी अधिकारी होते. तर आई मेरी अँटनी गोट्समन ही हंगेरीतील ज्यू ऑपेरा गायिका होती. अमृताच्या लहान बहिणीचे नाव इंदिरा होते. कलासंगीत व अभिनय याची उत्तम जाण असलेल्या अमृताला वयाच्या 8 व्या वर्षी उत्तम पियानो वादन येत होते. अमृताच्या मामांनी अमृताच्या चित्रकलेची आवड-रुची पाहून तिला पुढे शिकण्यास त्यांनी प्रोत्साहित केले.
20 व्या शतकातील या प्रतिभावन कलाकृतीचा समावेश भारतीय सर्वेक्षण खात्याने 1976 आणि 1979 मध्ये भारतातील सर्वश्रेष्ठ कलाकारांमध्ये केला आहे. अमृता शेरागीलांची चित्रे त्या काळातील अतिशय महागडी होती. तिच्यातील सुप्त कलागुण पाहून तिच्या वडिलांनी तिला फ्लॉरेन्स, इटली येथे शिकण्यासाठी दाखल केले. हेनगेरीयन आईबरोबर पॅरिस काळाबद्दल समजून घेण्यास फ्रान्सला पोहोचल्या तेव्हा त्या फक्त 16 वर्षाच्या होत्या. तेथे ल्युसीयन सायमनच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभ्यास केला.
1934 मध्ये त्या भारतात परत आल्या. वयाच्या 22 व्या वर्षी त्या चित्रकार बनल्या होत्या. भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची त्यांच्या मनात खूप उत्सुकता होती. भारतात त्या वेळेस इंग्रजांचे राज्य होते. आपल्या भारत देशातच आपण चित्रकारी करायचे आणि आपले भविष्य अजमावून पाहायचे त्यांनी ठरविले. त्या काळात भारतीय महिला व्यावसायिक शिक्षण घेत नव्हत्या. त्या फक्त रोजंदारी किंवा नौकर म्हणून काम करत असत. आशा परिस्थितीत अमृता मी एक चित्रकार म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. भारतात बिकट परिस्थिती असतानाही त्या शिमलामध्ये स्थायिक झाल्या आणि त्यांच्या जीवनपद्धतीमध्ये खूप बदल झाला. सर्व दूर फिरुन भारतातील लोकांचा त्यांनी अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या आजूबाजूला सगळीकडे गरिबी आणि श्रीमंती असा भेदभाव होता.
अतिशय गरीब, दुःखी, कष्टी लोकांना पाहून ती दुःखी झाली आणि या निसर्गरम्य वातावरणात त्यांनी या गरिबांचे दुःख कुंचल्याच्या माध्यमातून कॅनव्हासवर चितारले. दुःखी चेहरे, अत्यंत कृश, हडकुळे, काळ्या रंगाची हे माणसे, स्त्रीया आणि मुले, त्यांच्या मनातील दुःख, उदासीनता, महिला-पुरुषांच्या डोळ्यातील भीती, सुकलेले चेहरे या साऱ्या गोष्टी अगदी जशाच्या तशा अमृताच्या चित्रात मळकट काळपट रंगात स्थापित झाल्या. त्यांची चित्रे पाहून बेचैन होणारे प्रेक्षक त्यांना विचारतात की तुमच्या चित्रात आनंद का दिसत नाही? त्यावेळेस अमृता शेरगील म्हणतात आपल्या आजुबाजूला कुठेही आनंदी माणसे, स्त्रिया आणि बालक दिसत नाहीत. सगळीकडे गरिबी, लाचारी, दुःख, उदासीनता आहे. अशी परिस्थिती पाहून माझे मन दुःखाने भरून जाते. त्यामुळेच मी आनंदी चित्रे काढू शकत नाही. मी माझ्या चित्रात असे दुःखी भाव भरून लोकांना प्रेरणा देणार आहे. अशा संघर्षाला लढा देऊन आपले जीवन सुखी बनवा हा बोध चित्रातून अमृता शेरगीलने दिला. मुंबईला 20 नोव्हेंबर 1936 रोजी प्रदर्शन भरले. मुंबईला तिच्या चित्रांना खूप प्रतिसाद मिळाला. 1937 मध्ये तिच्या नात्यातूनच असलेल्या विक्टर इगाण या डॉक्टरांशी लग्न झाले. आधुनिक चित्रकलेच्या इतिहासात तिचे आगमन एखाद्या परिसरखे होते. तिच्या चित्रांनी भारतीय चित्रकलेला एक नवी दिशा दिली. त्यांनी आपल्या चित्रातून देशाला प्रभावित केले. एखाद्या चित्रकाराला अशी चित्रे बनवायला पूर्ण जीवन घालवावे लागले. पूर्ण निष्टेने बनवलेली ही चित्रे आज भारतभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या चित्रात किल्ला विकणारी, लिंबू विकणारी, बाजाराला जाणारे लोक, ग्रामीण भागातील दुःखी लोकांचे जीवन, डोंगराळ भागातील महिला-पुरुषांची चित्रे, ब्रह्मचारी, तीन जवान मुली, वधू, दुपारचा आराम,प्राचीन कथा वाचक ,गणेशपूजा पहाडी हृदय ,इ. चित्रे त्यांची अवर्णनीय आहेत.त्यांची बहुतेक चित्रे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट दिल्ली आणि खासगी संग्रहालयात आहेत. त्यांच्या चित्रामध्ये आत्मा आहे, भारताविषयी प्रेम आहे. त्यांच्या चित्रात प्रेम संवेदना असल्यामुळे अमृता शेरगील एक महान चित्रकार बनल्या आहेत. आशा महान महिला चित्रकाराचा मृत्यू 5 डिसेंबर 1941 मध्ये झाला.
चित्रकार/कवी: नादरगे चंद्रदीप बालाजी
श्री पांडुरंग विध्यालाय, कल्लूर
ता. उदगीर जि. लातूर
मो. 8605776478