उदगीरात पोलिसांवरील...ती घटना सत्यच पण फक्त बनून राहिली चौकातील गप्पाच

उदगीरात पोलिसांवरील...ती घटना सत्यच पण फक्त बनून राहिली चौकातील गप्पाच


उदगीर(प्रतिनिधी)- लातूर जिल्ह्यामध्ये फक्त उदगीर वगळता सगळीकडे जिल्हाधिकार्‍यांच्या शासन निर्णयानुसार संपूर्ण बाजार चालू असून दिलेल्या वेळेत व्यापारी व नागरीक लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करत आहेत. पण उदगीरमध्ये कोरोना पॉझेटिव्हचे २७ रूग्ण झाले असून त्यातील ११ बरे झाले आहेत तर १७वर उपचार चालू आहे. त्या अनुषंगाने उदगीर मध्ये संपूर्ण व्यापार बंद असून फक्त अत्यावश्यक सुविधांना मुभा देण्यात आली असून नागरीकांना सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत खरेदी विक्रीची सुट देण्यात आली आहे. जुने उदगीर रेड झोने मध्ये आले असून इतर भागात वेळेच्या नंतर संचारंबदी कडक चालू आहे. यामुळे सकाळी वेळ संपत येत असताना पोलिस प्रशासनाच्या वतीने सर्व व्यापारी व नागरीकांना गर्दी कमी करण्याची व नियमाचे पालन करण्याची सुचना देण्यासाठी भ्रमण करत फिरत असते. यामुळे नागरीकात ही थोडाफार धाक असतो व सेफ डिस्टंसचे नियम पाळले जाते. पण यास पत्तेवार चौक, भाजी मार्केट अपवाद असून या ठिकाणी हमेशा उदगीर वर कोणतेही संकट आले तर पोलिस व प्रशासनास संपूर्ण उदगीर सांभाळता येईल पण पत्तेवार चौकातील भाजी मार्केट सांभाळणे अवघड होते. कारण या ठिकाणी भाजी मार्केट, फळ,भाजीचे गाडे, व्यापारी, मटन मार्केट आहे व  या ठिकाणी संवेदनशील काळातही रोजच्या पेक्षाही जास्त गर्दी असते. येथे कोणत्या कोणत्या कारणावरून व्यापारी व भाजी विक्रेते, पोलिस प्रशासनासोबत हमरातुमरी होत असते. येथे पोलीस चौकी असून देखील येथील नामधारी आहे की या अशी चर्चा नागरीकात होत असते. असाच प्रकार परवा भाजी व मटण मार्केटमध्ये घडला.


उदगीर पोलिसांच्या वतीने संपूर्ण शहरामध्ये व्यापार्‍यांना व नागरीकांना सेफ डिस्टन्स व वेळेत बंद करण्यासाठी सूचना करण्यात येत होते. त्यामुळे इतर ठिकाणचे व्यापारी व नागरीक रस्ते खुले करण्यासाठी पळापळ करत होते. पण याला भाजी पत्तेवार चौकातील मार्केट अपवाद ठरले. याठिकाणी कांही पोलिस अधिकारी व कर्मचारी गर्दी कमी करण्यासाठी व्यांपारांना(पान ३वर) व्यवहार लवकर आवरण्यासाठी सूचना करत फिरत असताना भाजी व मटन मार्केटमधील कांही दुकानारांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त करत फक्त तुम्ही आम्हालाच टारगेट करता. इतर ठिकाणचे तुम्हाला दिसत नाही का? अशी नाराजी व्यक्त करत पोलिसांवर राग व्यक्त करत दुकानदार रस्त्यावर उतरले त्यामुळे पोलिसांना हि वेळ विषय वाढवण्याची नाही म्हणून सावरावार करत पोलिसांनी माघार घेत परतले. याची माहिती ऍडीशनल एस.पी. हिम्मत जाधव यांना कळताच तात्काळ उदगीर येऊन त्यांनी मार्ग काढून कार्यवाही न करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.


पण ही घटना गेल्या दोन दिवसापासून उदगीर शहरात चर्चीली जात असून नागरीक व पोलिस कर्मचार्‍यांच्यावतीने सुध्दा यास सहमत मिळत असून देखील यावर अधिकृत बातमी प्रसिध्दीस आली नाही. ही घटना केवळ चौकातील गप्पाच राहून जात आहे यामध्ये कांहीच्या मते पोलिसांवर मटन व भाजी मार्केटच्या दुकानादारांनी दगडं घेऊन मागे लागले, कोणी म्हणत आहे कि फक्त आम्हालाच टार्गेट का करता येथून निघून जा असे आरडाओरड झाली तर कोणी म्हणत आहे की पोलिसांवर हल्ला झाला पण पोलिस प्रशासनाच्या वतीने विषय न वाढवता सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी शांत राहिलेले बरे म्हणून यावर जास्त विषय वाढू दिला नाही. पण नागरीकांमध्ये कोणी साक्षात पाहिले तर कोणी चौकात सांगणार्‍याकडून ऐकले तर कोणी त्याला तिखट मिट लावून भलताच विषय रंगवला.


पण याला पोलिस प्रशासनाचा मोठेपणाच म्हणावा लागेल कि कुठल्या प्रकारची तक्रार किंवा कार्यवाही न करता विषय शांतपणे हाताळण्यात आला व व्यापार्‍यांना समजून सांगण्यात आले. देशभरात पोलिस व डॉक्टरांवर कांही ठरावीक लोकांकडून हल्ला होत असतानाच्या बातम्या प्रसारीत होत होत्या तर त्यावर देशभर असंतोषाचे वातावरण पसरले होते पण यास उदगीर पोलिस प्रशासन अपवाद ठरले आहे. पण त्यांना व्यापार्‍यांनी आता तरी आपली माणूसकी दाखवावी व वेळेचे भान ठेवेत प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे या परिस्थिती जो चुकतो त्यास शिक्षा होते पण केवळ आम्हालाच टार्गेट का करता हे बोलने योग्य नाही अशी नागरीकांतून बोलले जात आहे.