माजी आ.सुधाकर भालेराव यांच्यावतीने जळकोट मतदारसंघात धान्य वाटप




माजी आ.सुधाकर भालेराव यांच्यावतीने जळकोट मतदारसंघात धान्य वाटप

उदगीर(प्रतिनिधी)- गेल्या दोन तीन महिन्यापासून आपल्या देशात कोरोनाच्या संकटाने थैमान मांडेल असल्यामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कलम १४४ नुसार संचारंबदी,जमावबंदी कर्फ्युची परिस्थिती लागू असल्यामुळे लोकांना घराबाहेर पडता येत नाही. लॉकडाऊन लागू केल्यापासून देशभरात बाहेर कामासाठी असलेले सर्व नागरीक, मजूर, कामगार नौगरदार, पर्यटक हे ज्या त्या ठिकाणी अडकून आहेत. यामुळे शासनाच्या वतीने व स्थानिक सामाजिक संस्था, प्रशासनाच्या वतीने जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पण स्थानिक शहरी व ग्रामीण भागात गोरगरीब, रोजंदराीवर काम करणारे मजूर, कामगार, शेतकरी यांना मात्र आर्थीक व अन्नधान्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे विविध क्षेत्रातून अन्नधान्याच्या किट तयार करून गावोगावी घरोघरी जाऊन वाटण्यात येत आहेत. याकार्यासाठी सर्व क्षेत्रातील लोकानी पुढाकार घेतला आहे.
उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघात २ वेळेस आमदार म्हणून आपचे वर्चस्व गाजवणारे माजी आमदार सुधाकर भालेराव हे मागे न रहाता ज्या मतदारसंघाने आपल्याला दोन वेळेस आमदार केले व भरभरून प्रेम दिले तसेच विकास कामात मोलाचा सहकार्य करणार्‍या जनतेचे आता ऋण फेडण्याची वेळ आलेली आहे याची जाण ठेवत प्रत्येक संकाटत मी तुमच्या सोबत आहे, एकदा हाक मारा मी तुमच्या सेवेत राहिन असे न म्हणता गावा गावातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून तेथील परिस्थितीचा आढावा घेत संपूर्ण मतदारसंघातील प्रत्येक गावात गोरगरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यात येत आहे. यापूर्वी त्यांनी मास्क ही वाटप केला होता.यावेळी लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक धर्मपाल भाऊ देवशेट्टे,माजी जि. परिषद सदस्य चंदन पाटील उपस्थित होते.