बेकायदेशीर सावकाराकडून व्याजापोटी  धमकी व दमदाटी होत असल्यास तक्रार दाखल करावी


 बेकायदेशीर सावकाराकडून व्याजापोटी 
धमकी व दमदाटी होत असल्यास तक्रार दाखल करावीलातूर,दि.11:- बेकायदेशीर सावकाराकडून अवैधरित्या कर्जदाराची मालमत्ता हडप करणे, कर्जावर अवास्तव दराने व्याज आकारणे, बळाचा वापर करणे इ.प्रकार उघडकीस आल्यावर या अपराधापोटी लावली जाणारी शास्ती अथवा दंड याबाबत मुंबई सावकारी अधिनियम 1946 मधील तरतुदी हया अपु-या व कालबाहय झालेल्या असल्याने सावकारावर जरब बसविण्याइतका पुरक नव्हता म्हणून महाराष्ट्र शासनाने पुर्वीचा कायदा निरसित करुन महाराष्ट्र सावकारी (नियमन) 2014 हा कायदा हा कायदा महाराष्ट्र सावकारी नियमन (नियम) 2014 नव्याने लागू केले आहेत. 
सदयस्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोणा विषाणू (COVID-19) या महामारीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. अशातच लातूर जिल्हयामध्ये अनेक छोटे-मोठे व्यवसाय करणारे काही मजुर,कामगार बेकायदेशीर सावकाराकडून आठवडी महिनेवारीने कमी अधिक प्रमाणात व्याजाने पैसे घेतात आणि दररोज व्यापार करुन पैसे फेडतात. परंतु कोरोणा विषाणूमुळे राज्यामध्ये लॉकडाऊन लागू झाल्यामुळे मजुर व कामगाराचे व्यवसाय बंद झालेले असल्याने त्यांना बेकायेदशीर सावकाराचे व्याज देणे अवघड झाले आहे. त्यामुळे बेकायदेशीर सावकार अशा मजुर व कामगारांना दमदाटी व धमकी देत असल्याची बाब  जिल्हाधिकारी,लातूर यांचे निदर्शनास आली आहे.
लातूर जिल्हयातील ज्या व्यक्तींनी जे मजुर,कामगार किंवा अन्य व्यक्तींनी बेकायदेशीर सावकाराकाडून व्याजाने पैसे घेतले असतील व त्याबाबत बेकायदेशीर सावकाराकडून अशा लोकांना धमकी व दमदाटी होत असल्यास अशा लोकांनी  तात्काळ जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,लातूर अथवा संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयाकडे तक्रार दाखल करावी. जेणेकरुन बेकायेदशीर सावकारावर महाराष्ट्र सावकारी नियमन (नियम) 2014 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करणे सुलभ होईल असे जिल्हाधिकारी, लातूर व जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,लातूर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
     
                                         ****