लातुर 86 पैकी 61 निगेटीव्ह, 07 पॉझिटिव्ह, 09 अनिर्णित, 2 रद्द
लातूर, दि.30(जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 30 मे 2020 रोजी एकुण 86 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते.त्यापैकी 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 07 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत( तसेच पुनर्तपासणी तपासणी करण्यात आलेल्या पूर्वीच्याच पॉझिटिव्ह असलेल्या
07 व्यक्तींचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह), 09 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून 02 व्यक्तीचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत.
त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 37 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 19 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 11व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले( 11 पैकी 7 रुग्णांची पुनर्तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे) आहेत व 06 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून एका व्यक्तीच्या स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे.
यापूर्वीच 07 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्यामुळे त्यांना अगोदर पासूनच या संस्थेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीच्या 6 दिवसामध्ये 07 ही रुग्णांना कोरोना (कोविड19) चे लक्षणे होते.मागील 3-4 दिवसापासुन या रुग्णांना ताप, दम लागणे अथवा खोकला अशी कोणतीही लक्षणे नसल्यामुळे व त्यांना रुग्णालयात दाखल करून 10 दिवस झाल्यामुळे त्यांना Discharge देण्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची पुनर्तपासणी केली असता त्या 07 व्यक्तींचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले आहेत. परंतु त्यांना सद्यस्थितीत कोणताही त्रास नाही व त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे पुनर्तपासणी करून पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे पूर्वीचे आहेत.
*तसेच दिनांक 29 मे 2020 रोजी देसाई नगर येथील पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील 03 सदस्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व जिजामाता नगर, अंबाजोगाई रोड येथील 50 वर्षे वय असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून त्यांना कोरोना (कोविड19) ची लक्षणे आहेत, आशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. मारुती कराळे यांनी दिली
उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 33 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी 29 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून *एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ही व्यक्ती उदगीर शहरातील आहे* व 03 व्यक्तीचे अहवाल Inconclusive आले आहेत.
स्त्री रुग्णालय, लातुर येथील 16 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 02 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह असून या व्यक्ती मोती नगरच्या पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत* व एका व्यक्तीचा स्वॅब परीपूर्ण न आल्यामुळे रद्द करण्यात आला आहे, असे लातुर जिल्हयातील एकुण 86 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 07 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत(तसेच पुनर्तपासणी तपासणी करण्यात आलेल्या पूर्वीच्याच पॉझिटिव्ह असलेल्या
07 व्यक्तींचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह ), 09 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून 02 व्यक्तीचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
*********