कोरोनामध्ये शोधूया संधीचे सोनेरी किरण
कोरोनामध्ये शोधूया संधीचे सोनेरी किरण 


 

       जिकडे पहावे तिकडे 

        नाव गाजते कोरोनाचे

        फैलावे विषाणू जगभर

        उघडले डोळेही सर्वांचे 

           आज जगभरात कोरोना नावाच्या विषाणूने जो काही धुमाकूळ घातला आहे त्याने सकल मनुष्यजातीला नि:शब्द केले आहे. या विषाणूमुळे उद्भवलेल्या या भीषण परिस्थितीला तोंड देता देता चंद्रावर पोहोचलेला आणि बुद्धीच्या जोरावर अंतराळात उड्डाण घेणारा मनुष्यही त्याच्यापुढे हतबल,लाचार झाला आहे.या महामारीच्या विरोधात सरकारने ठोस पावले उचलायला सुरूवातही केलीय.या संसर्गजन्य प्राणघातक रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लसीकरण प्रक्रिया सुरू झाली असली तरी ते तडकाफडकी होणारे काम नव्हे. मनुष्याला आपल्या बुद्धिमत्तेवर  जो काही आत्मविश्वास होता तो लूळा पडला आहे, विकलांग झाला आहे. निसर्गाने आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवून दिली आहे. अजूनही वेळ निघून गेली नाही. स्वतःचे नि इतरांचे प्राण वाचविण्याकरिता सरकारने जो निर्णय घेतला आहे तो नक्कीच प्रशंसनीय आहे.

         अटळ असा  कोरोना

         फैलावतोय कणकण

        जरी आलाय वाट्याला

        शोधू संधीचे सुवर्णक्षण

             जरी बसलो आहोत लॉकडाऊन

होऊन घरात बंदिस्त,शोधूया त्यातुनच संधीचे किरण. शिकू नवनवे बैठे खेळ, रेखाटू चित्र कॅनव्हासवर.नवनवीन पाककृती शिकून वेळेचा करूया सारे सदूपयोग .करू भरमसाठ वाचन, लिखाण...... त्यातून उघडेल ज्ञांनाचे भांडार.....रचू कविता नि लिहू निरनिराळे शोधनिबंध....जीवनात एवढा मोकळा वेळ पुढे मिळेल न मिळेल,करून घेऊ वेळेचा पुरेपूर  उपयोग.शिकू नवनवीन तंत्रज्ञान जे उपयोगी  पडेल भविष्यात.

              निघून गेलेली वेळ नि सरलेले वय फिरून मिळत नाही.लक्षात ठेवू ही सुसुत्री नि या रटाळ जीवनावर फिरवू कात्री.घेऊ ध्यानात गांधीजींचा मंत्र "कल करेसो आज,आज करेसो अब" नि संधीच्या सुवर्णकिरणात शोधू प्रगतीची वाट. करूया आयुष्याचं सोनं याच काळात.....

        कोरूया सुवर्णाक्षरांनीच

        भावी जीवनासाठी खास

        सोनं संधीचं करूया सारे

        घडवूया आपण इतिहास

               काही युवकांना करियरच्या संधी प्राप्त करून घेण्यासाठी हा फावला

वेळ अनमोल असा आहे.हल्लीऑनलाईन  लेक्चर्स,क्लासेस होतच  असतात. निरनिराळ्या उद्योगधंद्यांचे प्रशिक्षणही यूट्युब तसेच लॅपटॉपच्या माध्यमातून मिळत असते.  गरज आहे या वेळेचा कोण किती फायदा घेऊ त्याची. काही मुला-मुलींना  गायन,नृत्य, योगा शिकण्याची नि शिकविण्याचीही आवड असते ती हौस,षौक पुर्ण करण्याची सुसंधी मिळेल.....चला तर होऊ परिपूर्ण या मोकळ्या वेळात...करू संकटाशी सामना नि फिनिक्स पक्षाप्रमाणे घेऊ राखेतूनच गगनभरारी.........

 

सौ.भारती दिलीप सावंत

मुंबई

9653445835