द्राक्ष ,टरबुज व टमाटे उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ....भरतभाऊ चामले यांची मागणी 

द्राक्ष ,टरबुज व टमाटे उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ....भरतभाऊ चामले यांची मागणी 



उदगीर- ( प्रतिनीधी)) -उदगीर तालुक्यातील आणि सीमावर्ती भागातील द्राक्ष उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध न झाल्यामुळे तसेच मजूर न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या फळ उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी .अशी मागणी महाराष्र्ट राज्य कापुस उत्पादक पनन महासंघाचे संचालक तथा उदगीर येथिल सहकार महर्षि रामचंद्रराव पाटील तळेगावकर ,उदगीर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघिचे चेअरमन भरतभाऊ चामले यांनी केली आहे.  उदगीर परिसरा सोबतच सीमावर्ती भागात फळफळावळ आणि भाजीपाला उत्पादन करून उदगीरच्या बाजारपेठेत आणला जात होता. मात्र या कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन आणि संचारबंदी मुळे मजूर शेतात आले नाहीत. तसेच वाहतूक करता आली नाही. आणि हाती आलेले द्राक्ष, टरबूज, टमाटे व इतर पिके यांची वाताहात झाली. चांगल्या वातावरणामुळे फळे चांगली आली होती. शेतकऱ्यांना यावर्षी चार पैसे मिळतील अशी आशा वाटत होती. मात्र ऐन वेळी शेतातूनमाल तोडून बाजारात घेऊन जाणे किंवा शहरात नेऊन विकणे, शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे हाती आलेल्या द्राक्ष, टरबूज, टमाटे तसेच इतर फळभाज्या त्यांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडला आहे. अगोदरच बँका आणि खासगी सावकारांचे कर्ज काढून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा निसर्गाने अडचणीत टाकले आहे. ते कर्ज परत फेडणे शेतकऱ्यांना अवघड आहे. आता पुन्हा संसार कसा उभा करायचा? हा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना पिकांचे कर्ज माफ करावे.  नुकसान भरपाई द्यावी. अशीही मागणी राज्य पनन महासंघाचे संचालक भरतभाऊ चामले  यांनी केली आहे. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. अशीही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.