लोकजागृती फाउंडेशने  शासनाच्या मोफत बस प्रवासाचा लाभ मिळून दिल्यामुळे ते २७ मजूर गावी रवाना

लोकजागृती फाउंडेशने  शासनाच्या मोफत बस प्रवासाचा लाभ मिळून दिल्यामुळे ते ५१ मजूर गावी रवाना


रोटी कपडा बँकेने केले त्या कामगारांची दोन दिवसाच्या जेवणाची व्यवस्था



लोकजागृती फाउंडेशने  शासनाच्या मोफत बस प्रवासाचा लाभ मिळून दिल्यामुळे ते ५१ मजूर गावी रवाना
रोटी कपडा बँकेने केले त्या कामगारांची दोन दिवसाच्या जेवणाची व्यवस्था
उदगीर (प्रतिनीधी ) - कोरोना महामारीमुळे देशात लाकडाऊनचा तीसरा टप्पा दि. १७ मे २०२० रोजी पूर्ण होत आहे. गेल्या आडीच महिन्यापासून संपूर्ण व्यवहार ठप्प झाल्यामुळे गोरगरीबांची उपासमारीची वेळ आल्यामुळे कामगार, मजूर आपापल्या गावी परत जात आहेत. कोणी अवैध्य मार्गाने तर कोणी पायी हजारो कि मी अंतर पार करत आहे. या दरम्यान विविध घटना घडत असून मजूरांचा जीव जात आहे. यामुळे केंद्र व राज्य सरकारने फक्त मजूर कामगारांसाठी त्यांच्या गावी परत जाण्यासाठी मोफत बस, रेल्वेची सोय केली आहे.  उदगीर शहर व तालुक्यातील कामगारांना  उदगीर तहसील कार्यालय येथे परीवहन महामंडळाची व खाजगी वाहनाच्या पासची सोय करण्यात आली आहे. पण या कामगांरांना या सुविधे विषय सविस्तर मिळत नसल्यामुळे ते परेशान आहेत.
असाच प्रकार लोकजागृती फउंडेशनचे अध्यक्ष महादेव घोणे यांना अनुभवयास आला. उदगीर येथे कामासाठी आलेले युपी, बिहारचे ५१ कामगार आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत होते. ते ज्या ठिकाणी काम करत होते तेथील मालक व ठेकेदार त्यांना राहण्यासाठी रुम भाडे व जेवनाची व्यवस्था करत नसल्यामुळे त्यांनी गावी जाण्याचा निर्धार केला होता. या कामगारांना हक्क मिळून देण्यासाठी त्यांच्चा ठेकेदारा संपर्क साधन्याचा प्रयत्न केला पण तो ठेकेदार सहकार्य करत नसल्यामुळे तेथील मुनीमशी बोलने झाले पण त्यानेही ठेकेदाराकडे सर्व काही आहे त्यालाच बोला म्हणून फोन कट केले . यामुळे हि वेळ त्या कामगारांच्या जीवनाचा प्रश्न सोडण्याची होती व त्यांना गावी जाणे आवश्यक होते. म्हणून ते पाससाठी तहसील कार्यालय येथे आले होते. त्यांना गावी घेऊन जाण्यासाठी कांही खाजगी वाहन मालकiकडून प्रत्येकी ५ हजार रुपये मागत होते पण त्यांची आर्थिक अडचणीमुळे त्यांना जाता येत नव्हते व शासनाच्या सुविधेचा अभाव होता. यावेळी महादेव घोणे यांनी पुढाकार घेऊन  त्यांची यादी तयार करून परिवहन महामंडळाचे गव्हाणे यांच्याकडे दिली व त्यांनी तात्काळ पुढील कार्यवाही सुरु केली. महादेव घोणे स्वतः वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केला व एस.टी. चे नियंत्रण प्रमुख कज्जेवाड यांनी कार्यवाही पूर्ण केली.  या दरम्यान त्यांच्या दोन वेळच्या जेवनाची व्यवस्था करण्यासाठी उदगीर शहरातील रोटी कपडा बँकचे खूशीद आलम यांना संपर्क साधला. ही संस्था अनेक वर्षापासून  निराधारांना, भुकेलेल्यांना मोफत जेवण त्यांच्या ठिकाणी  जाऊन वाटप करण्याचे  कार्य करत आहे.
आज दि१४ मे रोजी सकाळी ११.३० वा. व रात्री ९.३० वाजता उदगीर येथील बस स्टँड येथून बस मध्ये बसवून पाठवण्यासाठी लोकजागृती फाऊंडेशनचे अधक्ष महादेव घोणे,स्थानक प्रमुख धर्मपाल टiगाटोरे, वाहतूक नियंत्रक - विजय हल्लाळे, सुरेश कज्जेत्वाड,सी.एम. गव्हाणे, चंद्रकांत मुंडे व या मजूरांना  घेऊन जाणारे  चालक -तेलंगे एस.बी. सोबत रोटी कपडा बँकचे खूर्शिद आलम,  दै. लोकसत्ता व तरुण भारतचे प्रतिनीधी नागेंद्र साबणे, संदिप निडवदे,  उपस्थित होते.
यावेळी संपादक महादेव घोणे यांनी पुढाकार घेऊन सर्व कामगारांना एक रुपयही खर्च न येऊ देता रोटी कपडा बँकच्या सहकार्याने  दोन दिवस मोफत  जेवणाची व्यवस्था व महाराष्ट्र बस आगाराच्या वतीने मोफत  गावी जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे सर्वांचे जगत प्रसाद या कामगाराने सर्वांचे आभार मानले.