अपामानास्पद वागणुक दिल्याबद्दल भोपणीत मातंग समाजातील युवकाची अत्महत्या!
गुन्हा दाखल करण्यास पोलीस अधिकाऱ्याची टाळाटाळ ? अखेर मातंग संघटनेच्या व विविध सामाजिक संघटना व मिञ मंडळाने राज्यभर अदोंलन छेडण्याचा इशारा देताच देवणी पोलीसात गुन्हा दाखल
देवणी / प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील मौजे भोपणी येथील मातंग समाजातील युवक शैलेश व्यंकट मोतीरावे या युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली,त्यांच्या आत्महत्येस कारणेभुत असलेल्या दोघावर शुक्रवारी मयताचा भाऊ अनिल व्यंकट मोतिरावे यांच्या फिर्यादीवरुन 1) माधव आत्माराम जाधव 2) आत्माराम माधव जाधव या दोन अरोपीवर दि.28-5-2020 रोजी देवणी पोलीसात कलम 306,341,323,504,506,34 भा.द.वी.व अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार 3 (2)(5) नुसार गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत स्विस्तर माहिती आशी कि, मयत शैलेश व्यंकट मोतीरावे हा बुधवारी सायंकाळी गावातील आत्माराम जाधव यांच्या दुकानावर सुपारी खाण्यासाठी गेला होता यावेळी मागील उधारीवरुन वाद झाला होता,आरोपी माधव जाधव व आत्माराम जाधव या दोघांनी उधारीच्या पैसे वसुल करण्यासाठी लोखंडी एंगलला बांधून जातीवाचक शिवीगाळ करुन बेदम मारहान केली यामुळे अपमानास्पद वागणुक मिळाल्यामुळे या ञासाला कंठाळुन शैलेश मोतीरावे यांनी विहिरित उडी मारुन आत्महत्या केली,
एवढी मोठी घटना घडुन सुद्धा देवणी पोलिस अर्थिक व्यवहारापोटी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती,व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याला अखेर मातंग समाज आन्याय आत्याचार निवारण समितीचे राजाभाऊ सुर्यवंशी,व शिवाभाऊ कांबळे मिञ मंडळाच्या वतीने राज्यभर अदोंलन छेडण्याचा इशारा देताच अखेर देवणीच्या हाप्तेखोर पोलीस अधिकाऱ्यांने तात्काळ गुन्हा दाखल केला आहे आता पुढील तपास देवणी पोलिस कशा प्रकारे करणार हे येणाऱ्या काळात कळेल हे मात्र नक्की