नवनाथ गायकवाड यांचे कार्य कौतुकास्पद :- डी.वाय.एस.पी जवळकर


 *उदगीर: एरव्ही बारा महिने आनंदाचे उधाण शोधून उठ सुठ आनंदोत्सव साजरा करणाऱ्या पण समाजातील गरीब, दुर्बल अन् मजूर लोकांनकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या या संस्कृतीमध्ये चांगल्या व्यक्तीची आणी चांगल्या कार्याची तशी वानवाच आहे.. पन., राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड मात्र याला अपवाद आहेत असे प्रशंसोदगार उदगीर उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर यांनी काल रघुकुल मंगल कार्यालय समोर आयोजित कार्यक्रमात काढले.*


*या कोरोना महामारीमध्ये असंख्य गरीब , मजूर, कामगार लोकांचे जगणे असहाय करून टाकले असताना आणि एक वेळेच्या जेवणाची ही प्रचंड मारामार असताना अर्धपोटी उपाशी झोपलेल्या या लोकांना आपण उपाशी ठेऊन आपला लग्न वाढदिवस साजरा करावा हे चोवीस तास गरीब लोकांचा, समाजांचा विचार करून सदैव सामाजिक कार्य करणाऱ्या नवनाथ गायकवाड यांना कदापि ही पटले नाही., त्यांनी आपली अर्धांगिनी, सहचारिणी प्रा. सौ पुष्पा यांच्याशी चर्चा केली आणि दोघांनीही आपल्या लग्न वाढदिवसाचा समारंभ टाळून गोर गरीब जनतेला / लोकांना अन्नाचे दोन घास भरविण्याचा ताबडतोब निर्णय घेतला व गरिबीमुळे ईद उत्सव साजरा न करू शकणाऱ्या मुस्लिम बांधवांना व समाजातील विधवा निराधार महिलांना अन्न धान्याचे किट वाटप करून त्यांचे चेहऱ्यावर समाधानाचे सुहास्य फुलवून साजरा केला.. इतकेच काय तब्बल दोन महिन्यापासून या कोरोनाच्या महामारी मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल व नवनाथ गायकवाड मित्र मंडळच्या माध्यमातून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पार्टटाईम घर तर फुल्ल टाइम समाजसेवा या ध्यासाने झपाटून आज अविरतपणे न थकता, न थांबता गोर गरीबांना सर्वतोपरी मदत करत आहेत., मायेचे चार घास भरवत आहेत.. या सर्व आदर्श कार्याची मुक्तकंठाने स्तुति वाहवा श्री जवळकर साहेबांनी केली आहे.. तसेच यापुढे ही नवनाथ गायकवाड मित्र मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून ते असेच कार्य उदगीर मधील जनतेसाठी करत राहतील आणि समाज व प्रशासन यातील एक महत्वाचं दुवा ठरतील अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लातूर जिल्हाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, उदगीर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष भरत चामले, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल प्रदेश उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, प्रा. सौ पुष्पा नवनाथ गायकवाड, युवा उद्योजक यशवंत सोनफुले, राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर शहराध्यक्ष शेख समीर, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस अजीम दायमी, राष्ट्रवादी अल्पसंख्याक उदगीर तालुकाध्यक्ष अजहर शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे लातूर जिल्हा सरचिटणीस अतिक शेख, दत्तात्रय काळोजी गुरुजी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित सोशल डिस्टन्सचे पालन करून अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्पमित्र श्याम पिंपरे, दीपक मोरे, शंकरराव जाधव गुरुजी, अशोक काळोजी, पांडुरंग सूर्यवंशी, संतोष पांढरे, शालिवाहन गिरी, राजेश सुत्रावे,मनीष मुळे व गिरीष स्वामी यांनी अथक परिश्रम घेतले.