उदगीर(प्रतिनिधी)-कोरोनाच्या माहामारीमुळे उद्योग धंदे, बंद झाल्यामुळे गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. हातावर काम करणार्या लोकांना या काळात आर्थिक संकटाचा समाना करावा लागत यामुळे त्यांच्या पोटाची भूक भागवणसाठी जमेल तेवढी मदत करण्यासाठी कोणी व्यक्तीगत, सामाजीक संस्था, मित्र मंडळ आदी लोक समोर येत आहेत. याच धर्तीवर उदगीर येथील एका हिंदी वृत्तपत्राचे संपादक इरफान शेख यांनी आपल्या मित्रपरीवाराच्या मदतीने एका कुटुंबाची जेम तेम १० -१५ दिवस पोट भरेल एवढे धान्याचे किट तयार करून वाटप करत आहे. या रफ्तार फाऊंडेशनचे काम फक्त कोरोना महामारीतच नाही तर इतर वेळीही सामाजिक बांधीलकी सांभाळत अविरत कार्य केले जात आहे.
याच सोबत उदगीर येथील शुभ मंगलम बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थे अंतर्गत लोकजागृती फाऊंडेशनच्या वतीनेसुध्दा आपला खारीचा वाटा म्हणून मित्र परीवाराच्या सहकार्याने कांही गरजु कुुटुंबाना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. गरजू लोकांकडून लोकाजागृती फाऊंडेशनकडून पुन्हा आशा वाढल्या यामुळे वेळ न घालवता लोकाजगृती फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव घोणे यांनी रफ्तार फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख यांना संपर्क साधला असता तात्काळ अन्नधान्याच्या किटीची मदतीचा हात दिला यामुळे लोकजागृती फाऊंडेशनच्या माध्यमातून कांही कुटुंबाचा प्रश्न सुटला.
लॉकडाऊन झाल्यामुळे आनेक गरीब व हातावरील पोट असलेल्या व्याक्तीचे काम बंद झाले त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे रफ्तार फाऊंडेशनने सामाजिक जिनिवेतून रफ्तार फाऊंडेशनचे इरफान शेख यांनी व त्यांच्या टिमने उदगीर शहरातील व परीसरातील गरजू परिवाराला जिवनावश्यक वस्तूचे मदत केली. फाऊंडेशनच्या वतीने गरीब व गरजूच्या शोध घेत त्यांच्या निवासापर्यंत जात आतापर्यंत ६०० गरजूंना रेशन कीट देण्यात आले. रफ्तार फाउंडेशन आणि मित्र परिवार च्या सहकार्यमुळे हे काम चालू असुन त्यांच्या कामाचे कौतूक होत असुन रफ्तार फाउंडेशनचेच्या वतीने उदगीरमध्ये हे कार्य चालू राहणार असल्याची माहिती रफ्तार फाउंडेशनचे इरफान शेख यांनी सांगितली.
लोकजागृती फाऊंडेशनच्या वतीने दानशूर व्यक्तींना आवहान करण्यात येते की ज्यांना आपल्यामाध्यमातून खारीचा वाटा उचलायचा असेल तर त्यांनी लोकजागृती फाऊंडेशनच्या माध्यमातून एखाद्या गरीब कुटुंबच्या मदतीला धावा असे आवहान महादेव घोणे यांनी केले आहे.
लोकजागृती फाऊंडेशनच्या दानत्वाला रफ्तार फाऊंडेशनची साथ
लोकजागृती फाऊंडेशनच्या दानत्वाला रफ्तार फाऊंडेशनची साथ