राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते उदगीर ते रावनकोळा रस्त्याच्या हॉटमिक्स कामाचा शुभारंभ

राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते उदगीर ते रावनकोळा रस्त्याच्या हॉटमिक्स कामाचा शुभारंभ


 


लातूर/उदगीर, दि.30(जिमाका) : उदगीर ते रावनकोळा नांदेड जिल्हा सीमा हद्द पर्यंतच्या रस्त्याच्या हॉटमिक्स कामाचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम, पुनर्वसन, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला.


       केंद्रीय रस्ता निधीतून होत असलेल्या या कामावर 6 कोटी रुपये खर्च होत असून 18 किलोमीटर चे काम लवकरात लवकर व दर्जेदार असे काम पूर्ण करण्याच्या सूचना राज्यमंत्री बनसोडे यांनी संबंधित ठेकेदार यांना दिल्या व शासकीय यंत्रणेने या कामावर व्यवस्थित लक्ष ठेवून काम वेळेत पूर्ण करून घ्यावे असे निर्देशही त्यांनी दिले. 


   यावेळी बस्वराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, कल्याण पाटील, शिवाजी मुळे, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मारलापल्ले, मंजुरखान पठाण, समीर शेख, फैजुखा पठाण, संजय पवार, ज्ञानोबा गोडभरले, शमशोद्दीन जरंगर, नाना हाश्मी आदी उपस्थित होते.