नात्यांची नवी गुंफण -मैत्री
सांगली येथील बालसाहित्यिका वर्षा चौगुले यांचा मैत्री नावाचा बालकथा संग्रह नुकताच प्रकाशित झाला. यापूर्वी त्यांचे भरलेल आभाळ, पेलवेना भार हा, चाफ्यांची ओंजळ, स्मार्ट बाँक्स इत्यादी पुस्तके प्रकाशित झाले आहेत.
मैत्री बाल कथासंग्रहात आठ कथा आहेत. आपलं मन आपण किती मोठे केले पाहिजे. एकमेकांच्या सुख दुःखात सामील व्हायला हवे. आई ,आजोबा आणि बंटी यांचे घट्ट नाते मैत्री या बालकथेतून गुंफलेले आहे. कुणी घर देता का घर ही त्यांची दुसरी कथा जंगलातील प्राण्यांच्या सभेवर आधारीत आहे. माकडोबा, ससोबा, नागोबा, कोल्होबा यांच्या सोबत अनेक प्राणी सभेत असतात. शिकार हा महत्त्वाचा विषय मांडलेला आहे. प्राण्यांची कत्तल केली जात असून तोडगा काढण्यासाठी उपाय केला गेला असला तरी कोणीही माणसांची छळ करायचा नाही हा प्रामाणिक प्रयत्न प्राण्यांत असतो हा गुण या कथेतून उभा केला आहे. चिमणी हा बालकांचा आवडीचा विषय आहे. चिमणीच्या पिल्लाला लागले म्हणून ही लहान मुले त्याची बाळासारखी सेवा करतात. पण पिल्लाला हात लावला की त्याला जवळ घेतले जात नाही हे चिमणी सांगत असते. आणी पिल्लाला आपल्या मारते. तेव्हा ती लहान मुले त्या पिल्लाला मारू नका असे प्रार्थना करत असतात. खूप काही गोष्टी चिमणी या कथेतून शिकायला मिळतात.
सुट्टीत खूप मुले मित्रांना एकत्र करून मजा करत असतात. पडतात, रडतात, आई वडील रागात असतांना हे बच्चे कंपनी एकमेकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. एकमेकात घट्ट विण मैत्रीची विणली जाते. पाऊस आणि जमिनीचे नाते कसे असते ते येरे येरे पावसा या कथेतून चित्रीत केले आहे. जमिनीकडे पळत असतांना पावसाच्या थेंबाला घाम फुटतो आणि तो मातीत पडतो.. विरघळतो आणि तेथे हिरवे हिरवे कोंब फुटतात. धरतीला आनंद होतो. खूप छान कथा लेखिकेने रंगवलेल्या आहेत. वाचाल तर वाचाल या कथेत वाचत राहिल्यास वाचनाची आवड कशी निर्माण होते हे सरस्वती बाई कशी पटवून देण्याचा प्रयत्न करते आणि ते खरेही होते.
लहान मुलांना खूप आवडणा-या साध्या सोप्या भाषेत लिहलेल्या ह्या कथा मनोरंजन तर करतातच पण प्रबोधनही करतात. प्रसिद्ध साहित्यिका नीलम मानगावे यांची प्रस्तावना तर आतील रंगीन चित्रे व मुखपृष्ठ नीलिमा साने यांनी रेखाटले आहेत.
त्यांच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा!
प्रा. रामदास केदार
9850367185
मैत्री
वर्षा चौगुले
मधुराज प्रकाशन, पुणे
किंमत-१००
Attachments area