401 दिव्यांग व्यक्तींना मोटोराईज्ड ट्रायसिकलचे

401 दिव्यांग व्यक्तींना मोटोराईज्ड ट्रायसिकलचे वाटप होणार

लातूर, दि.20:- जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींसाठी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम लिमीटेड (एलिम्को) जिल्हा प्रशासन, लातूर समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव, सहाय्यक उपकरणे मिळविण्यासाठी तपासणी शिबीराचे आयोजन तालुकानिहाय दिनांक 31 डिसेंबर 2019 ते 07 जानेवारी 2020 या कालावधीत करण्यात आलेले होते. 

 सदरील शिबीरामध्ये दिव्यांगाकरिता तीन चाकी सायकल, कृत्रिम अवयव –हातपाय व्हीलचेअर, सर्व प्रकारच्या काठया, सीपी. चेअर, वॉकर, एम.आर.कीट, स्मार्ट केन, डेसी प्लेअर, ब्रेक कीट, स्मार्ट फोन, श्रवणयंत्र, मोटाराईज्ड सायकल आदि साहित्य देण्याकरिता 11 हजार 888 दिव्यांग व्यक्तीची मोफत तपासणी करण्यात आलेली होती. तपासणीमध्ये मोटोराईज्ड ट्रायसिकलकरीता पात्र असणाऱ्या 401 दिव्यांग व्यक्तींना मोटोराईज्ड ट्रायसिकलचे वाटप कोविड-19 विषाणू बाबातची संचार बंदी संपुष्टात आल्यानंतर वाटप करण्यात येणार आहे.

 सदर मोटोराईज्ड ट्रायसिकलसाठी असणारा 25 टक्के दिव्यांग व्यक्तींचा हिस्सा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर यांचेकडून जिल्हा परिषद सेस मधून रूपये -44 लाख 16 हजार इतकी रक्कम आलिम्कोकडे जमा करण्यात आलेली आहे. पात्र दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव, सहाय्यक उपकरणे यांचे वाटपाबाबतची दिनांक व ठिकाण लवकरच लाभार्थ्यांना कळविण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी, संतोष जोशी, सभापती, समाज कल्याण समिती रोहिदास वाघमारे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी संयुक्तरित्या कळविलेले आहे.