लॉकडाऊनमुळे अन्न व पाण्यासाठी शहरी व वन्य मुक्या प्राण्यांचे जीव धोक्यात?

मादलापूरचे सरपंच व गावकर्‍यांनी वन्य प्राण्यासाठी जपली मणसातली माणूसकी 

मादलापूर: (प्रतिनिधी)-कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये गेल्यामुळे रस्त्यावर एक ही मनुष्य दिसत नाही. वाहूतक रहदारी, व्यवसाय,औद्योगीक कंपनी,कारखाने, पर्यटन स्थळे, तिर्थक्षेत्रे आदी संपूर्ण बंद असल्यामुळे या पृध्वीतलावर माणूस राहतो का प्राणी राहतात आता हा विषय बनला आहे. कारण मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी निसर्गावर आघात करून आपले वर्चस्व प्रस्थापीत केल्यामुळे आपल्या सोबत दुसरा एक मुका प्राणी व पक्षी या पृध्वीवर राहतात हेच आपण गेला होतो. पण कोरोना विषाणुमुळे सर्व मानवाला रस्त्यावर फिरतने मुश्किल झाले आहे. यामुळे वन्य पाणी आता हळू हळू बाहेर पडू लागले आहेत व शहरात शिकराव करत आहेत. पण त्यांना मोकळा श्‍वास मिळाल असे नाही तर ते सुध्दा आता अन्न व पाण्याच्या शोधात फिरत आहेत. यामुळे त्यांच्या पासून मानवाला धोका आहे की काय असे चिन्हा निर्माण होत आहेत. याच सोबत शहरी भागात रहाणारे पाणी प्राणी कुत्रे, गायी, बैल, पक्षी यांच्याही उपासमारीची वेळ आली आहे. कारण शहर व गावात माणूस स्वत:ला घरात बंद करून घेतल्यामुळे व अन्नधान्याचा साठी पुरेसाच असल्यामुळे माणूस आपापली उपजिवीका भागवत आहे. यामुळे प्राण्यांनाही मिळेल ते खाऊन रहावे लागत आहे. याचसोबत शहरात व ग्रामीण भागात मोकाट फिरणारी कुत्रेसुध्दा आता परेशान झाल्याचे दिसत आहे कारण आपल्या परीसरामध्ये नवीन प्राणी दिसला की सर्व कुत्रे एकत्र येऊन त्यांच्यावर हल्ला करत आहे. तर वन्य प्राण्यांना शहरी भागात येऊन अन्न व पाण्यासाठी फिरत असताना धोका निर्माण होत आहे.
उदगीर तालुक्यातील मादलापूर येथील सरपंच गोविंद शिंदे, यशवंत चव्हाण, संजय सूर्यवंशी तिघे शेताकडे जात असताना हरणास काही कुत्रे चावत असलेले यांच्या निदर्शनास आले. या तिघांनी हरणा जवळ जाऊन कुत्र्यांना पिटाळून लावले व हरणास ताब्यात  घेतले व घरी घेऊन आले. त्या हरणास कुत्र्याच्या चावामुळे थोडीसी जखम झाली होती यामुळे सरपंच व नागरीकांनी आपली माणूसकी जपली व तात्काळ कम्पाऊंडर अनंत सूर्यवंशी यांना फोन करून बोलावून घेतले व त्या हरणास मलमपट्टी करण्यात आली. पण हरीण हे हलक्या काळजाचे असे असे म्हणतात त्यामुळे  हरीण कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे आधिच घाबरले होते. त्या नंतर वनविभागाचे आधीकारी डीगोळे यांना ग्रामसेवक केंद्रे, यशवंत चव्हाण, सा.उदगीरचा आवजचे संपदाक श्रीकृष्ण चव्हाण, यांनी फोन केला. दोन कर्मचार्‍यांना लॉकडाऊमुळे येण्यास ३ ते ४ तासाचा वेळ गेला. यावेळेत त्या हरणास उपचार करून ही तो घाबरल्यामुळे त्याने आपले प्राण सोडले. वनविभागाचे कर्मचारी वेळेवर आले नसल्यामुळे हरणाचा जीव गेला यामुळे मादलापूरचे सरपंच व गावकर्‍यांना आपण केलेल्या प्रयत्नला यश आले नाही अशी नाराजीची प्रतिक्रिया व्यक्त केली.
याविषय्ी दै.एकजूट लोकजागृतीचे संपादक महादेव घोणे यांनाही वनअधिकारी डिगोळे यांच्या विषयी विचारणा केली असता उदगीर तालुक्यात अशा तीन घटना घडल्या आहेत यामध्ये दुसरी घटना लोहारा येथे एक वानर करंट लागून मृत्यू पावला व वाढवणा परीसरात हराचे बछडाही मरण पावला गेला. या तिन्ही मृत प्राण्यांना ताब्यात घेऊन त्यांचा अंत्यविधी करण्यात आल्याची माहिती दिली. यामुळे शहरी व नागरीकांनी जर असे वन्य प्राणी आले त्यास हाणी न पोंचवता त्यांच्या अन्न व पाण्याची व्यवस्था करावी जेणे करून त्यांच्या मुळे नागरीकांना त्रास होणार नाही व तात्काळ वन विभागास कळावे असे डिगोळे यांनी दै.एकजूट लोकजागृतीच्या माध्यमातून नागरीकांना आवहान केले.