लोकजागृती फाउंडेशने ८ कुटुंबांना गावी सुखरूप पोंचवले

लोकजागृती फाउंडेशने ८ कुटुंबांना गावी सुखरूप पोंचवले
डॉ. रामप्रसाद लखोटीया यांनी ट्रॅव्हल्स तर सतिश उस्तुरे यांची आर्थिक मदत



उदगीर (प्रतिनीधी ) - कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊनचा तीसरा टप्पा दि. १७ मे २०२० रोजी पूर्ण झाला आहे. गेल्या आडीच महिन्यापासून संपूर्ण व्यवहार ठप्प झाल्यामुळे गोरगरीबांची उपासमारीची वेळ आल्यामुळे कामगार, मजूर, भटके आपापल्या गावी परत जात आहेत. कोणी अवैध्य मार्गाने तर कोणी पायी हजारो कि मी अंतर पार करत आहे. या दरम्यान विविध घटना घडत असून मजूरांचा जीव जात आहे. यामुळे केंद्र व राज्य सरकारने पर राज्यातील फक्त मजूर, कामगारांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी मोफत बस, रेल्वेची सोय केली आहे.   पण अतंर राज्यात मोफत बसची सुविधा नाही त्यामुळे इतर जिल्हयात जाण्यासाठी नागरीकांची अडचण निर्माण होऊ लागली आहे. कांही जण पोटाच्या उदरनिर्वहासाठी कामानिमीत्त आलेल्यांना आर्थिक आचणीचा सामना करावा लागत आहे व जाण्यासाठी वाहनाची सोय नाही त्यामुळे ज्या त्या ठिकाणी अडकून आहेत.
देगलूर रोडवरील शासकीय आय.टी.आय. च्या मागे भटके गोसावी समाजातील लहान मोठे एकूण २२ जणांचे ८ कुटुंब गेल्या चार महिन्यापासून मिळेल ते काम करण्यासाठी झोपडी करून राहात होते. पण लॉक डाऊन सुरू झाल्यामुळे त्यांचे काम बंद झाले व असलेली जमा पुंजी ही संपण्याची वेळ आली त्यामुळे त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत होता. याच सोबत मागील आठवडयात जोराचा मोठा वादळी वारा व पाऊस पडल्यामुळे त्यांच्या झोपडया फाटल्या व त्यांना उघडयावर रहावे लागले. त्याच फारलेल्या कापडांना शिवून कसे बसे दिवस काढू लागले. उदगीरमध्ये निराधारांना मोफत जेवण वाटणारी रोटी कपडा बँक या संस्थेने रोज दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली. याच बरोबर उदगीर येथील विश्व हिंदु परीषदेचे संतोष कुलकर्णी व त्यांच्या संघटनेच्या वतीने त्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. पण कुटुंबात लहान मुलं असल्यामुळे त्यांच्या पोटाची व आरोगयाची काळजी भासू लागली व त्यांनी गावी जाण्याचा निर्धार केला पण जाण्यासाठी  गाडीची सोय व  ऑनलाईन सुविधा सुरु झाल्यामुळे  शासकीय परवानगी मिळव्यासाठी अडथळे येत होते.
या विषयी रोटी कपडा बँकेचे खूर्शीद आतम यांनी लोकजागृती फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव घोणे यांना माहिती दिली व त्यांच्या राहण्याची व्यवस्था तहसीलदार यांच्या वतीने शासकीय मदत मिळव्यासाठी विनंती करण्यास सांगितले व महादेव घोणे हे उदगीरचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना संपर्क साधून सर्व माहिती दिली. यावेळी तहसीलदारांनी कुटुंबा विषयी माहिती घ्या कांही तरी उपाय करू असे आश्वासन दिले. यामुळे महादेव घोणे यांनी समक्ष तेथे जाऊन पाहणी केली व अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सर्व  कुटुंब सोलापूर जिल्यातील मंगळवेडा तालुका मौ.मानेवाडी या गावचे रहिवाशी आहेत. उदगीर येथून ६०० कि.मी. अंतर पार करून  गावी जाण्यासाठी त्यांनी मदतीची विनंती केली. पण या कार्यवाहीसाठी दोन -तीन दिवसाचा वेळ लागणार होता. लोकजागृती फाउंडेशनचे कार्य पाहून शिरीष घोणे, जालना,अॅड. शहाबादे, लातूर  आदींनी  आर्थिक मदत केली. महादेव घोणे  त्या कुटुंबाच्या जेवणासाठी   किराणा भरून दिला व खाजगी वाहनासाठी  शोध सूरू केला. उदगीरात दानशूरांची कांही कमी न०हती. उदगीर येथील सुप्रसिद्ध उदयगिरी लॉयन्स नेत्र रूग्णालयचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लाखोटिया हे उदगीरच नव्हे तर लातूर जिल्ह्याच्या बाहेरही नामांकित आहेत. डॉ. लखोटिया सदैव मदतीसाठी तत्पर असतात.  त्यांनी या लॉकडाऊनच्या काळात ५० मजूरांना राहण्याची व जेवणाची महिनाभर मोफत सोय केले कर्नाटक मधील त्यांच्या गावी मोफत ट्रॅव्हल्सची सोय करून सोडले. यामुळे महादेव घोने यांनी त्यांच्याकडे ट्रॅव्हल्सची मदत  मागितली व त्यांनी विलंब न लावता  डिझेल टाकून घेऊन जा असे सांगितले. पण त्या कुटुंबाकडे थोडी फार आर्थिक सोय होती  व उर्वरीत ड्राय०हर भत्ता व टोलनाका यासाठीआर्थिक मदतीसाठी महादेव घोणे यांनी मातृभूमी महाविद्यालयाचे संस्थापक सतीश उस्तुरे यांना संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ रू. ५ हजारची मदत दिली. शासकीय पारवाणगीसाठी महादेव घोणे यांनी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना भेटून पास देण्याची विनंती केली असता विलंब न लावता पास वितरण विभागाचे गुट्टे यांना पास लवकर देण्यास सांगितले  व एका दिवसात पूर्ण कार्यवाही झाली व पास मिळाला.
आज दि. १८ मे रोजी दु. ३ वा. या सर्व कुहुंबाना रोटी कपडा बँकच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली. ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यासाठी डॉ. बशीर शेख यांनी पूर्ण कार्यवाही पूर्ण केली. त्यांनी सामाजीक सेवा म्हणून परराज्यातील कामगारांना मदत म्हणून मोफत  मेडिकल प्रमाणपत्र,मोफत बस व खाजगी वाहणाची परवाणगी काडून देण्याचे काम केले. आजही त्यांनी या कामासाठी पूर्ण जबाबदारी पार पाडली. त्या सर्व कुटुंबाना ट्रॅव्हल्स मध्ये बसवून तहसील कार्यालय येथून रवाना करण्यात आले.
यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, लोकजागृती फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव घोणे,न.प. सदस्य मनोज पूदाले, मातृभूमी महाविद्यालयाचे संस्थापक सतीश उस्तुरे , विश्व हिंदु परीषदेचे संतोष कुलकर्णी , सुधीर पाटील, डॉ. बशीर शेख, लोकसत्ता व तरुण भारतचे प्रतिनीधी नागेंद्र साबणे हे उपस्थित होते. लोकजागृती फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव घोणे यांनी केलेल्या या कार्याचे वरील सर्वानी कौतूक केले. तसेच मल्लीकर्जुन स्वामी, सोलापूर जिल्हा जंगम समाज अध्यक्ष राजशेखर पंदलगावकर मंगळवेडा जंगम समाज अध्यक्ष सिध्दू स्वामी व सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.