प्लास्टिकच्या कचऱ्याचा करून निचरा, 'जागतिक जलसंपत्ती दिन' होईल साजरा
दरवर्षी 24एप्रिल हा दिवस *जागतिक जलसंपत्ती दिन* म्हणून जगभर साजरा केला जातो.
प्रत्येकाने पाणी जपून व काटकसरीने वापरण्याची गरज आहे. *थेंबे-थेंबे पाणी वाचवा,संपूर्ण सजीव सृष्टी वाचवा.* पाण्याने आणि उन्हानेही प्लॅस्टिक कित्येक वर्षे कुजत नाही.पाण्यात सजीवासाठी घातक पदार्थ मिसळले की पाणी दूषित होते आणि पाण्यातील जीवजंतू नष्ट होतात.त्यामळे प्लास्टिकचा वापर कमी करा.
आपल्या देशातील अनेक राज्यात दुष्काळ पडतो. पृथ्वीचा भाग पाण्याने 71टक्के व्यापला आहे .परंतु पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त 3 टक्के आहे .त्यामुळे पाण्याचा वापर गरजेइतकाच करावा . *पाणी हेच आपले जीवन आहे* आजकाल पाण्याचा खूप अपव्यय होताना दिसून येतो .
आपल्या देशातील अनेक राज्यात दुष्काळाचा तडाखा बसतो. *आशा वेळी पशु-पक्षांची काळजी घेतली पाहिजे.* दुष्काळी भागात पाण्यासाठी लोकांना खूप दूरवर जावे लागते. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा, पाणी, जमीन आशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत. हवा, पाणी , वने आणि वन्य जीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे, अधिकाधिक झाडे लावणे, प्रदूषण घटवणे, इंधनाची बचत करणे, विजेची बचत करणे, पण्याची बचत करणे, प्लास्टिकचा वापर न करणे. *जागतिक जलसंपत्ती दिनानिमित्य* वरील विषया संदर्भात जनजागृती करता येते.
अन्न, पाणी, वस्त्र या आपल्या सर्वांच्या गरजा आहेत. त्यांची पूर्तता होण्यासाठी आपण निसर्गावर अवलंबून आहोत. याशिवाय अभ्यास, खेळ, मनोरंजन यासाठी आपण अनेक साधनांचा वापर करतो. आपल्याला लागतील तेव्हा त्या वस्तू उपलब्ध व्हाव्यात म्हणून अनेक वस्तू घरात साठवून ठेवतो या सर्व गोष्टी आपल्याला पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात. जगभरातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत. याच कारणांमुळे पर्यावरणाचा खुप वेगाने ऱ्हास होत आहे. मानव हा निसर्गाचाच भाग आहे. निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा मानवी जीवनावरही परिणाम होतो. याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला हवी. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी एखादे साधन शक्य तितके जास्त दिवस वापरणे, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनविणे याचा सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवे.
वृक्षतोडीमुळे पाणी , हवा हे दोन घटक मोठया प्रमाणात प्रदुषीत झाले आहेत . जलप्रवाहात कारखाण्यातून निघणारा रासायनिक कचरा , मैला , घाण आणि घन कचरा यामुळे नदी नाले व अन्य भुमितील पाणी घातक झाले आहे . त्याचबरोबर *प्लास्टिकच्या प्रदुषणामुळे नाल्या, नद्या,सागरावर एक नवं आणि मोठं संकट ओढावलं आहे* . प्लास्टिक हा अत्यंत घातक ठरणारा पदार्थ आहे . प्लास्टिक कचऱ्याचा निचरा कसा करायचा हाच प्रश्न सध्या देशासमोर उभा आहे . 100 ते 150 फुटापर्यंत सागरामध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून आले आहे . आतापर्यंत अमाप कचरा गावातून , शहरातून नदयामार्फत सागरापर्यंत पोहचलेला आहे आणि *सागरात या प्लॅस्टिकच्याच कचऱ्याचे पर्वतरांगा तयार झाले असावेत असे मला वाटते !*
ई कचरा म्हणजे विजेवर वापरली गेलेली साहित्य परंतू त्यात ती नादुरूस्त झालेली उपकरणे म्हणजेच 'ई' कचरा होय . यात फ्रिज , रेडीओ , मायक्रोजेवह ओव्हन , फूडप्रोसेसर , सी.डी. , डिव्हीडी प्लेअर , कुलर , पंखे सर्व प्रकारचे संगणक , कॅलक्यूलेटर बॅटरी , कि बोर्ड , माऊस , मोबाईल , इलेक्ट्रीक वस्तू इ . खराब वस्तुही कचऱ्यात समाविष्ट होत आहेत . सर्व वस्तूवरील प्लॅस्टीकचे आवरण अशा प्रकारचा कचरा समुद्रापर्यंत पोहचतोय.
प्लास्टीक आता आपली गरज झाली आहे . प्लास्टिक खूप स्वस्त आहे आणि ते कुठेही आपणास सहज मिळणार आहे . त्यामुळे आपण प्लास्टिकचा वापर चालूच ठेवतो . त्यात प्लॉस्टिकच्या , पाण्याच्या बाटल्या, खाऊचे डब्बे, बदल्या, चमचे, प्लास्टिकच्या मणी, प्लास्टिकच्या वेगवेगळ्या खेळणी, ट्यूब लाईट्स, बल्बांचे काच हा सर्व घातक कचरा समुद्रात आढळून आला. आजूबाजूच्या ढिगाकडं नजर टाकली तर भरमसाठ प्लास्टिक पिशव्याच तुम्हाला दिसतील. शिळे पदार्थ त्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये घालून टाकल्यामुळे आशा ठिकाणी गाय, कुत्रा, शेळी, डुक्कर, गाढव त्या पिशव्या चघळत असलेल्या आपणास दिसतील. जमिनीवरील प्राणी व जलचर प्राणी या पिशव्याकडे खाद्य म्हणून पाहतात आणि खातात. आशा प्लास्टिक पिशव्या खाल्ल्यामुळे त्यांच्या पचन क्रियेत बिघाड निर्माण होतो आणि आखरे आशा प्राण्याचा मृत्यू होतो. जर या प्लास्टिक पिशव्या आपण जाळल्या तर त्यातून अनेक विषारी वायू हवेत मिसळतात आणि खूप मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होते. या पिशव्या ऊन आणि पावसानेही कुजत नाहीत. याच पिशव्या शेतीमध्ये जास्त प्रमाणात आढळल्या तर तेथील जमीन नापीक बनते.
या प्लस्टिकमुळे पर्यावरणाला तर हानी पोहचतेच आहे .अशा कचऱ्यामुळे सागराचे पाणी तर खराब होऊन तेथील बरेच सजीव मरण पावले आहेत आणि त्यांच्या मरणाने हे सागराचे पाणी अधिकच दूषित बनले आहे . या शिवाय आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्यही धोक्यात येतं त्यामुळे प्लास्टिकला पर्याय म्हणून ऊसाच्या चिपाडापासून अनेक वस्तू तयार करता येतात त्याचबरोबर कागदापासूनही (रद्दी कागद) अनेक मजबुत व टिकाऊ वस्तू बनविता येतात . कागदी पिशव्याचाच वापर करावा .प्लास्टिकच्या पिशव्या टाळाव्यात . भविष्यात हे होणे खूप गरजेचे आहे .
वाढत्या लोकसंख्येमुळे घरगुती सांडपाणी , साबणयुक्त पाणी , भाज्यातील तेलयुक्त पाणी , सेंद्रिय असेंद्रीय पदार्थ अशा प्रकारचे पाणी मोठया प्रमाणात गटारामार्फत नदयात तर नदयामार्फत थेट समुद्रात येत आहे . त्यामुळे होणाऱ्या जलप्रदुषणाने सागरातील सजीवाचे प्रमाण घटत चालले आहे . सागरी भागात अशा दुषीत जलप्रदुषणाने गोठ्या प्रमाणात दुष्परीणाम होत आहे . *हे जाणूनच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीनी नदयाची स्वच्छता मोहिम देशभरात राबविली आहे . नदयाचे पात्र नेहमी स्वच्छ असले पाहिजे , याविषयी ' मन की बात ' कार्यक्रमाद्वारे ते जनतेपर्यंत पोहचले आहेत . त्यांच्या या कार्याला देशभरातूनच साथ मिळाली आहे . अलीकडच्या काळात लोकसंख्या वाढीमुळे प्रदूषणाचे प्रमाण खूप वाढलेले आहे . त्यावर आळा बसविण्याचे काम मोदीजीने केले आहे . प्रत्येक देशवासीयांच्या मनात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण केली आहे . *जागतिक जलसंपत्ती दिनानिमित्य मोदीजींच्या या कार्याला शतशः प्रमाण* !
नादरगे चंद्रदिप बालाजी
श्री पांडुरंग विद्यालय , कल्लूर
ता. उदगीर जि. लातूर
मो. नं. 8605776478