१४५ कुटुंबांना एनजीओ तर्फे प्राप्त अन्नधान्य किट शासनाच्या वतीने वाटप- तहसीलदार मुंडे
उदगीर(प्रतिनिधी)- सध्या कोरोना सारख्या महामारीचा प्रादूर्भाव चालू असल्यामुळे संपूर्ण जगावर याचे संकट कोसळेल आहे. प्रत्येक देश आपापल्या देशाची सुरक्षीतता सांभाळत आहे. लॉकडाऊन सुरु असल्यामुळे व्यापार, उद्योग, व्यवसाय, रोजगार सध्या बंद असल्यामुळे सर्वांना घरातच बसावे लागत आहे यामुळे सर्वसामन्य व रोजदांरीवर आपले कुटुंब चालवणार्यावर आर्थिक संकट कोसळल्यामुळे भूकमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शासनाच्या वतीने गोरगरीब जनतेला मोफत रेशन, जेवणाची सुविधा पुरवत तर आहेच पण देशावरही आर्थीक संकट कोसळल्यामुळे सरकारच्या वतीने उद्योगपती, नौकदार, स्वयंसेवक, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन सरकारला व गोरगरीब जनतेला अन्न धान्य, जेवणाची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे सर्वजण पुढाकार घेऊन मदत करत आहेत. उदगीर तहसील कार्यालय येथे कांही स्वंयसेवी संस्थांनी अन्नधान्याच्या किट दिल्या होत्या.त्यानिमित्त उदगीर तहसीलच्या वतीने उदगीर शहर व परीसरताली गोरगरीब जनतेला किटचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील संजय नगर, फुले नगर गातील हातावरचे पोट असणार्या १४५ लोकांना किट वाटप करताना स्वत: तहसीलदार व्यंकटेश मुंडे, बी.डी.ओ. गिरी,, नगर लखन कांबळे, पप्पू गायकवाड व पोलिस प्रशासन व तहसीलचे पदाधिकारी उपस्थित होते.