सरकारच्या दुर्लक्षामुळे पत्रकारांची सुरक्षा रामभरोसे

सरकारच्या दुर्लक्षामुळे पत्रकारांची सुरक्षा रामभरोसे


मुंबईत ५३ पत्रकारांना करोनाची लागण


मुंबइ- ५३ पत्रकारांना करोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या आठवड्यात पत्रकार संघानं मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या करोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये १६८ जणांची करोना चाचणी घेण्यात आली. रविवारी मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार १६८ पैकी ५३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेले बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील असल्याचे समजतेय.
बीएमसीमधील आरोग्य विभागाचे आधिकारी अमेय घोले यांनी दिलेल्या माहितीनुसार १६८ पत्रकांराच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५३ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना दिली आहे.
टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार ३० पेक्षा जास्त पत्रकारांना करोनाचा संसर्ग झाला आहे.  टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशन आणि मंत्रालयातील पत्रकार संघाच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकांराच्या करोना चाचणीसाठी विशेष कॅम्प आयोजित केला होता. करोनाचा संसर्ग झालेल्यांमध्ये बर्‌याच जणांना करोनाची कोणतीही लक्षणेही नव्हती तर अद्याप काही पत्रकारांच्या चाचणीचा अवहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे ही संख्या आणखी वाढू शकते असंही म्हटलं जातेय.
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या देखरेखीखाली १६ आणि १७ एप्रिल रोजी पत्रकार आणि कॅमेरामॅनच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या. मुंबई प्रेस क्लबच्या जवळ या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं.  करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पत्रकार आणि कॅमेरामॅन यांना सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करा, तसेच हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझर्सचा वापर करावा, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.


उदगीर(प्रतिनिधी)- सरकारच्या विविध उपाययोजना, कार्य,जनतेपर्यंत व जनतेमधील अडीअडचणी सरकार पर्यंत पोंहचवण्यासाठी इलेक्ट्रनिक मिडिया व प्रिंट मिडिया स्व खर्चाने संकटाचा सामना करत आपली भूमिका पूर्ण करते. जेंव्हा देशात नैसर्गिक,राजकीय, धार्मीक आपत्तीमुळे संकट निर्माण होते त्यावेळेस सरकारची भूमिका व उपायोजना जनतेपर्यंत पोहंचवणे,  सरकार जिथे पोंहचू शकत नाही तेथील सत्यपरिस्थिती सरकारपर्यंत पोहंचवण्याचे काम पत्रकार हा धोक्याच्या ठिकानाहून स्वत:चा जीव धोक्यात टाकून विना सुरक्षा कवच पत्रकारीता करत असतो. यावेळेस या पत्रकाराकडे स्वत:च्या पत्रकारीतेच्या आयकार्ड शिवाय दुसरे कांहीही साधन नसते. परिस्थिती हाता बाहेर गेल्यानंतर सरकारच्या वतीने कलम १४४ कर्फ्यु, लावण्यात येते त्यावेळेस पोलिस,  एसआरपी, कमांडो, आर्मीला पाचारण केले जाते याकाळातही पत्रकार स्थानिक रिपोर्टींग करण्यासाठी फिरत असतो. पण या पत्रकारास प्रसारमाध्यमाच्या मालकाकडून किंवा शासनाकडून आर्थीक मदत, संरक्षण विमा, आरोग्य सुविधा अशा कुठल्याच प्रकारची सुविधा पुरविली जात नाही व या काळातच प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी, पोलिस अधिकारी, मागील काळात भ्रष्टाचार करताना, खोटे गुन्ह्यामध्ये एखाद्या निरपरधाला अडकवताना किंवा आरोपीला सहकार्य करत असल्याच्या बातम्या एखादा पत्रकार छापत असेल त्यावेळेसचा बदल घेण्यासाठी हे  प्रशासकीय अधिकारी वेळ साधून पत्रकारांना विनाकारण मारहाण करणे, खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांचे कॅमेरे फोडने, गाड्या जप्त करण्याचे काम करतात. यावेळी पत्रकारांच्या बाजूने भूमिका मांडण्यासाठी कोणताही राजकीय पुढारी, व्यापारी समोर येत नाही व हप्ते मागीतले, तुमच्या विरोधात बादनामीची बातमी देतो म्हणून धमकी दिली म्हणून पत्रकारांची बदनामी केली जाते. 
सध्या कोरोनासारख्या महामाहीरचे संकट संपूर्ण जगावर कोसळले आहे. अमेरीका, इटली, ब्रिटन, चीन सारख्या बलाढ्या देश सुध्दा हार मानत आहेत. यामध्ये फक्त आपला भारत देश त्यांच्यापेक्षा खूप सुरक्षीत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळ प्रसंगानुसार सावध राहून संपूर्ण देशात २१ दिवासचे लॉकडाऊन केल्यामुळे आपला देश सुरक्षित आहे. याकाळात सरकार, पोलिस, डॉक्टर व  अत्यावश्यक सुविधा पुरविणार्‍या सर्व विभाग आपापली महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. सरकार तर्फे सर्वांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे व सर्वांची काळजी घेण्यासाठी औषधे, मास्क, पीपीई, सॅनिट्राईज, कर्मचार्‍यांना संरक्षण विमा, गोरगरीब जनतेला मोफत जेवन, अल्पदरात राशन पुरविले जात आहे. पण पत्रकार हा एकच माध्यम आहे ज्याकडे सरकारचे कसल्याच प्रकारचे लक्ष नाही. सरकार, प्रशासन,पोलिस, वैद्यकीय विभाग यांच्या सोबत अंगावर कोरोनाचे संकट ओढून घेऊन ग्रामीण, शहरी कोरोनाग्रस्त परिसर, हॉस्पिटल, मार्केट ठिकाणी जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहे ज्यामुळे सरकारला बसल्या ठिकाणी सत्य परिस्थितीची माहिती मिळत आहे. पण सरकारतर्फे पत्रकारांना कुठल्या सुविधा पुरविल्या जात नाहीत, उलट पोलिस प्रशसानाकडून बातमी संकलनासाठी फिरत असलेल्या पत्रकारांना आयकार्ड दाखवून सुध्दा मारहाण व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत. यामुळे पत्रकारांना आर्थीक, विनासंरक्षणाच्या संकटाचा सामना करावा लागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार प्रशासन, पोलिस, डॉक्टरासोबत पत्रकार हा देखील महत्वाचे काम करत असून तोही या काळात एक देशाचा सैनिक आहे त्यामुळे त्यांनाच्या कार्याचा गौरव करणे गरजेचे आहे सांगत असताना देखील पोलिस अधिकारी मात्र आपली मागील खुन्नस काढून पत्रकारांना संकटात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.