सार्थक मेडिकल व महात्मा पब्लिक स्कूलच्या वतीने पत्रकारांना मास्क, सेनेटायजर, व रुमाल याचे वाटप
उदगीर प्रतिनिधी सार्थक मेडिकलचे मालक दीपक नेत्रगावे व महात्मा पब्लिक स्कूलचे सचिव तथा दक्षता समितीच्या सदस्य संगीता नेञगावे व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य माननीय, अभिजित आवटे यांच्या संयुक्त विद्यमाने उदगीरच्या पत्रकारांना कोरोना या विषारी संसर्ग रोगाची साथ सुरू असल्यामुळे, मास्क, रुमाल व सेनेटायजर याचे देगलूर रोड येथील महात्मा पब्लिक स्कूल मध्ये नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकारा बरोबरच बाळू शिंदाळकर, सुशील पेनसलवार, संजू मेहकरे इत्यादी जर उपस्थित होते.