तबलिगीच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोना संसर्गाचा वेग दुप्पट

तबलिगीच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोना संसर्गाचा वेग दुप्पट झाला"




नवी दिल्ली | राजधानी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे 'कोरोना'संसर्गाचा वेग दुप्पट झाला, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजार 374 वर गेला आहे.


भारतातील कोरोना फैलावाचा वेग वाढण्यास तबलिगी जमातीचा कार्यक्रम जबाबदार असल्याचं आकडेवारीमुळे सिद्ध होत आहे. दिल्लीतील 'तब्लिगी जमाती'च्या कार्यक्रमामुळे कोरोना व्हायरसच्या केसेस वाढल्या आहेत.


गेल्या चोवीस तासात 'कोरोना'चे 472 नवे रुग्ण आढळले असून या कालावधीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील तिघांसह महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे.


दरम्यान, भारतात आतापर्यंत 79 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर 267 कोरोनाबाधित उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत.