आदेशाचे पालन करत दोन्ही बाजार समितीनी शेतकर्‍यांचे माल खरेदी करावे- सहाय्यक निबंधक एल. पवार
आखेर रंगराव पाटील कृषी उत्पन्न खाजगी बाजार समिती शेतकर्‍यांचे माल खरेदीसाठी खुली

आदेशाचे पालन करत दोन्ही बाजार समितीनी शेतकर्‍यांचे माल खरेदी करावे- सहाय्यक निबंधक एल. पवार

उदगीर(प्रतिनिधी)-कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काळामध्ये शेतकर्‍यांचे हित लक्षात घेवून पालकमंत्री ना.अमित देशमुख, जिल्हाधिकारी, उपजिल्हा उपनिबंधक व रंगराव पाटील कृषी उत्पन्न खाजगी बाजार उदगीर यांना महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या सूचनेनुसार बाजार समिती चालू करण्याची परवानगी दिली.
लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यात दि.२१ एप्रलि पासून केंद्र व राज्य सरकारने अत्यावश्यक साधनासाठी नियमाचे पालन करणार्‍यांना परवानगी देण्याची जाहिर होताच उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकर्‍यांचा माल खरेदी करण्यास सुरुवात केली पण पहिल्याच दिवशी आडत व्यापारीव शेतकर्‍यांतर्फे शासनाच्या नियमाचे उल्लंघन करीत खुले आम बाजार सुरु होते व माल विक्रीसाठी उदगीर तालुक्यातील शेतकर्‍या ऐवजी बाहेरील राज्यातील जास्त व्यापारी आपला माल विकण्यासाठी येथे आले होते व पत्रकारांच्या सतर्कतेमुळे बाजार समिती बंद करावी लागली. शेतर्‍यांचे नुकसान होत असल्यामुळे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन शासनाच्या निकषाप्रमाणे खरेदी करावी असे सांगण्यात आले. यामुळे उदगीर येथील रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती देखील शेतकर्‍यांसाठी माल खरेदीस पात्र होती. पण उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व खाजगी बाजार समीती यातील व्यवहारीक कलहामुळे एकमेकांच्या चुका दाखवत प्रशसानाची दिशाभूल करण्यात येत होती. यामुळे खूद पालकमंत्री व प्रशासनाने नियमाची अट घालून दोघांनाही पुन्हा चालू करण्यासाठी आदेशीत करण्यात आले. पण कृ.उ.बा.च्या स.ची आवक कमी होईल या भीतीने प्रशासनाची दिशाभूल करत रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार उदगीर बंद करण्यासाठी प्रशासनाकडे तक्रारी करण्यात येत होत्या यामुळे काल सहाय्यक निबंधक  एल. पवार यांनी खाजगी बाजार समितीची पाहणी करून शासनाकडे अहवाल पाठवला व रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकर्‍यांच्या हितासाठी चालू करण्यासाठीची परवानगी देण्यात आली.
यानुसार रंगराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकर्‍यांनी आपल्या मालाची नोंद अक्षय पाटील मो.-९४०५३४११०० व ज्ञानेश्‍वर बिरादार मो.-९०२११०९६०२  यांच्याकडे सकाळी ९ ते सायं. ५ यावेळेत  करून घ्यावी व आपले नाव, गांव,मोबाईल नंबर, मालाचा प्रकार व किती पोते याबाबतची रितरसर माहिती नोंदवावी ज्या शेतकर्‍यांनी नाव नोंदणी केली आहे त्यांनी रंगराव पाटील कृषी उत्पन्न खाजगी बाजार तर्फे मोबाईल मेसेज केला जाईल, सदरील मेसेज मध्ये संपूर्ण माहिती दिली जाईल त्याच पध्दतीने दिलेल्या तारखेस व वेळेत फक्त उदगीर तालुक्यातीलच शेतीमाल खालील सूचनाचे पालन करून घेतले जाईल असे आवहान रंगराव पाटील कृषी उत्पन्न खाजगी बाजार,उदगीरचे सचिव प्रतापराव पाटील यांनी सर्व शेतकर्‍यांना केले आहे.
शेतकर्‍यांनी शेतीमाल  बाजार समितीमध्ये आणतेवेळी खालील नियमावलीचे पालन करावे.
१) फोनवर नोंदणी केलेलाच शेतीमाल विक्रीसाठी स्विकारला जाईल.
२) शेतकर्‍यांनी कोणत्याही प्रकारे ओळखपत्र(उदा.आधारकार्ड/मतदान ओळखपत्र/बँक पासपबूक अथवा मेसेज आलेला मोबाील ) सोबत आणावे.
३) बाजार आवारात प्रवेश करताना शेतकर्‍यांनी हात धुण्याकरीता व्यवस्था केलेल्या ठिकाणी गेटवर प्रथम हात धुऊन जावे.
४) शतेकर्‍यांनी यार्डामध्ये प्रवेश करताना तोंडाला मास्क/रूमाल बांधूनच बाजार आवारात प्रवेश करावा.
५)शेतकर्‍यांनी बाजार आवारात एकमेकापासून ५ ते ६ फूट अंतरावर उभे रहावे.
६) शेतकर्‍यांनी शेतीमाल विक्रीच्या (सवाल) वेळी गर्दी न करता आपले शेतीमालाजवळच उभे रहावे.
७) एका वाहनात एकच शेतकरी असावा.
८) दररोज मर्यादीत स्वरूपातआवक नोंदवली जाईल.
९) शेतीमालाचे रिकामे वाहन बाजारातून त्वरीत यार्डाबाहेर काढावे रिकामे वाहन बाजा जास्त वेळ उभे दिसल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
१०) शेतकरी बंधूनी नोंदणीचे वेली दिलेल्या मोबाील क्रमांकावर संदेश, फोनद्वारे शेतीमाल आणण्याचा दिनांक व वेळ कळविण्यात येईल. त्यानंतरच शेतकर्‍यानी आपला शेतीमाल दिलेल्या तारखेला व वेळेला बाजार आवारात आणावा व इतर वेळी आणलेल्या शेतीमालाला किंवा विना नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांना बाजार आवारात प्रवेश दिला जाणार नाही.
शासनाने दिलेल्या वरील नियमाचे पालन करत सर्व शेतकर्‍यांनी मेसेज मिळाल्यानंतर दिलेल्या तारखेस वेळेवर उपस्थित रहावे व येताना वाहनासोबत जास्त नागरीक सोबत घेऊन येऊ नये असे सांगण्यात आले आहे.