रोटी कपडा बँकेचे मोलाचे योगदान

.


रोटी कपडा बँकेचे मोलाचे योगदान
ओएमएसएस योजने अंतर्गत गरजू कुटुंबांना अन्न धान्य वाटप करण्यासाठी संस्थला धान्य देण्याची शासनाकडे मागणी 


लॉकडाऊनमध्ये अडकलेले विद्यार्थी व नागरीक शासनाच्या मदतीपासून वंचित



उदगीर - उदगीर येथील रोट कपडा बँक ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असून गरजू नागरिकांना विना शुल्क मोफत अन्न व कपडा पुरवने, आजारी रूग्णांना दवाखान्यार्यंत पोहंचवणे व त्यासाठी लागणार्‍या सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य करत आहे. सध्या रोटी कपडा बँक ही नगर पालिकेच्या माध्यमातून चालू असलेल्या निराधार लोकांचे निवारा केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी मुक्कामी जवळ जवळ ४०च्यावर निराधार लोकांना रोजच्या रोज जेवणाची सोय केली जाते. येथील साफसफाई, दैनंदिन गरजाचे साहित्य मोफत देण्याचे काम रोटी कपडा बँकेच्या वतीने केले जाते. 
सध्या कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू असल्यामुळे देशात विविध ठिकाणी कामानिमित्त, प्रवासासाठी, शिक्षणासाठी अलेल्या विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची मोफत सोय शासन स्थानिक प्रशासनाच्या वतीने केली जात आहे. उदगीर येथील निराधार लोकांचे निवारा केंद्रामध्ये उदगीर येथील कृषी विद्यालयाचे विविध राज्यातील ३२ विद्यार्थी  लॉकटडाऊन सुुरू झाल्यापासून अडकून आहेत. त्यांना नियमित तीन वेळचे जेवण देण्यात येत आहे. यासोबत संस्थेच्या वतीने उदगीर शहरातील गरीब व गरजू कुटुंबाना १३ प्रभागात मुसा नगर, शह सैलानी, फुले नगर, संजय नगर, पेठ दरवाजा, किल्ला गल्ी, म्हाडा कॉलनी, राम नगर, देगलूर रोड, बिदर रोड, येनकी रोड, कृष्ण नगर, गांधी नगर, उमा चौक व उदगीर शहरातील शासकीय व निमशासकीय दवाखाने यामध्ये अडकलेल्या रूग्णाच्या नाते वाईकांना व रूग्णास अन्न पुरवठा करीत आहेत. याच सोबत औरंगाबाद येथून रेल्वे पटरी ने पायी आपल्या गावी जात असलेल्या(पान ३वर) झारखंड राज्यातील नागरीक, हुबळी कर्नाटक येथून लोहा,जि.नांदेड येथील ३ व्यक्ती, उत्तर प्रदेश येथील ७ नागरिक अशा जवळपास १७०० नागरिकांना दररोज ३ वेळच्या जेवणाची व्यवस्था शासनाच्या एक रूपाच्या मदतीविना रोटी कपडा बँकेच्या वतीने स्वखर्चाने केले जात आहे.
इतर राज्यात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्व नागरीकांची राहण्याची व जेवणाची सोय ही इतर राज्यामध्ये शासनाच्या वतीने केली जात आहे पण उदगीर येथील प्रशासनाचे सफसेल याकडे दुर्लक्ष असून पोलिसांना व प्रशासनाला बाहेरील व्यक्ती कोणी सापडले तर त्याची आरोग्य तपासणी करून त्यास निवारा केंद्र येथे सोडले जाते पण त्यांच्या जेवणाची सुविधेची जबाबदारी नगर परिषद, तहसील कार्यालय, उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने घेतली जात ऩाही. रोटी कपडा बँकेच्या वतीने शासनाकडून शासनाच्या दराप्रमाणे अन्नधान्य खरेदी करून येथे अडकलेल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी उपजिल्हाधिकारी व तहसलीदार यांच्याकडे मागणीचे अर्ज केले होते पण यास कुटल्या प्रकारचा दुजोरा मिळत नसल्याचे सांगण्या येत आहे. यामुळे येथील निराधार लोकांच्या जेवणाची जबाबदारी ही रोटी कपडा बँकेवर पडली असून दानशूर लोकांच्या सहकार्यावरच सर्व कांही चालू आहे. खरे तर शसानाच्या वतीने लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या लोकांची जेवणाची व राहण्याची मोफत सोय केली पाहिजे पण येथील लोकांची संख्या वाढत आहे पण अन्न धान्य पुरवठ्याची जबाबदारी शासनाच्यावतीने घेतली जात नाही.