उदगीर(प्रतिनिधी)- सध्या कोरानाचे संकट असल्यामुळे देशात लॉकडाऊन सुरु आहे व शासनाने अत्यावश्यक गराजांनाच कायद्याचे पालन करण्यासाठी कलम १४४ नूसार संचारबंदी,जमावबंदीस प्रतिबंध आहे. एकाठिकाणी किमान ४ व्यक्तीच्या वर उभे राहता येत नाही तसेच कोरोनाचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. किमान १० ते १५ फूटाच्या अंतरावरून एकमेकांशी व्यवहार करावा तसेच खरेदी दुकानदाराने कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करणे गरजचेे आहे. मात्र उदगीर येथील बाजार समिती सुरु झाल्या पहिल्याच दिवशी शासनाच्या सर्व नियमाचा धज्जा उडाला होता. एकाच दिवशी सर्व धान्याच्या खरेदी विक्री सुरु होत्या याच सोबत खरेदी विक्री करणार्याचंी रोजच्या पेक्षा जास्त गर्दी व नियमाचे उल्लघंन केले जात होते. यात विशेष म्हणजे फक्त उदगीर तालुक्यातीलच शेतकर्यांचे धान्य करण्या ऐवजी कर्नाटक,आंध्रा मधून शेतकर्या ऐवजी व्यापारीच गाड्या घेऊन आल्या होत्या यामुळे वेळप्रसंग साधत बाजार समितीस बंद ठेवावी लागली.
पण काल यापेक्षाही मोठा अजबच कारभार झाला व आडत आसोसशीएशनचे अध्यक्षच येणकी माणकी रोडवरील जनावाराच्या बाजारात खुल्या मैदानात चिंचाची खरेदी विक्री सुरु केली व याठीकाणी उदगीर तालुक्याच्या ऐवजी बाहेरील राज्यातीलच शेतकरी व व्यापार्यांची गर्दी जमली व कलम १४४ चे उल्लंघन व कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी तर कुठलाच उपाय नव्हता. सध्या लातूर जिल्हा सुरक्षित असून राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे फक्त जिल्ह्यातच व्यवहार केले जातील असे असताना देखील उदगीर तीन राज्याच्या सीमा लगत असल्यामुळे उदगीर तालुक्याच्या ऐवजी जास्त तर इतर राज्यातीलच शेतकरी व व्यापारी धान्य खरेदी विक्रीसाठी येतात. कालही असाच प्रकार झाला असून चिंचेची खरेदी विक्री सुरु होती. मात्र मादलापूरच्या ग्रामस्थांना कळताच त्या ठिकाणी येऊन बाजार बंद करण्यास भाग पाडले व बाजार समितीचे सभापती मून्ना पाटील यांनी येथे येऊन तात्काळ येथील बाजार बंद करण्याचे निर्देश दिले.
जनावाराच्या बाजारात १४४ चे उल्लंघन करत चिंचेची खरेदी जोरात?
जनावाराच्या बाजारात १४४ चे उल्लंघन करत चिंचेची खरेदी जोरात?