निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
दरम्यान देशभरात लाॕकडाऊन असतानाही येथील आनंदमुनी चौक परीसरातील जामाबाग मज्जीदमध्ये तेलंगणा राज्यातील १२ जण आले असल्याची कुणकुण पोलिसास लागली.तातडीने शुक्रवारी सकाळी पोलिस व आरोग्य विभागाच्या पथकाने या मज्जीद मध्ये जावून या १२ जणांची चौकशी करुन वैद्यकीय तपासणी केली.सदरील १२ जण हे नंदीयाल जि.कर्नूल येथील आहेत.हरीयाणा येथील हिसार व फिरोजपूर या दोन ठिकाणचे धार्मिक कार्यक्रम आटोपून हे सगळेजण टेम्पोटॕक्स या गाडीने आपल्याकडे गावी निघाले होते.गुरुवारी रात्री ते शहरातील जामाबाग मज्जीद मध्ये मुक्कामास थांबले होते.हरियाना -निलंगा या प्रवासादरम्यान त्यांनी ४-५ राज्याचा प्रवास केला आहे.आरोग्य विभागाच्या पथकाने यांची प्राथमिक तपासणी केली आहे.या तपासणीत या १२ जणांमध्ये काही लक्षण आढळून आले नसले तरी पुढील तपासणीसाठी त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून खबरदारीचा उपाय म्हणून या मज्जीदचा ५०० मीटरचा परिसर औषध फवारणी करुन निर्जंतूक करण्यात आल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी सांगितले. कोरोनाच्या या भयावह संकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट लाॕकडाऊन असताना देखील या १२ जणांनी हरीयाना ते निलंगा एवढ्या लांबीचा अवैध प्रवास केल्याबद्दल जाणकारांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्वॕब नमुण्याचा तपासणी अहवाल काय येणार ?
लातूरला पाठवण्यात आलेल्या या १२ जणांच्या स्वॕब नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असून या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच यातील कोणाला कोरानाची लागण झाली आहे कि नाही ते कळेल असे वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञाने सांगितले.त्यामुळे नेमका अहवाल काय येतो याकडे या मज्जीद परिसरातील अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे