भारतीयांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे, ते नक्कीच कोरोनाला हरवतील"

भारतीयांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे, ते नक्कीच कोरोनाला हरवतील"



 



नवी दिल्ली | भारत हा उष्ण प्रदेशातील देश आहे तसेच मलेरियामुळे येथील लोकांची रोगप्रतिकारकशक्ती अधिक आहे. त्यामुळेच भारतीय लोक कोरोनाला नक्कीच हरवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असं डब्लूएचओचे विशेष अधिकारी डॉ. डेव्हिड नबारो यांनी म्हटलं आहे.


जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी भारताकडून सुरु असणाऱ्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. डब्लूएचओचे विशेष अधिकारी असणाऱ्या डॉ. डेव्हिड नबारो यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतातील लॉकडाउनचं स्वागत केलं आहे.


केंद्र सरकारने कोरनाचा संसर्ग थांबववण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचे नबारो यांनी कौतुक केल. तसेच लॉकडाउनदरम्यान लोकांना त्रास होत असला तरी कठोर निर्णयांमुळे जेवढा जास्त त्रास होईल तेवढ्या लवकर या संकटापासून भारतीयांची सुटका होईल असे मत नबारो यांनी मांडलं.


सर्वात आधी या संकटाचे गांभीर्य ओळखल्याबद्दल भारतीयांचे आभार मानले पाहिजेत. या संकटाशी दोन हात करण्याची क्षमता भारताकडे आहे. भारताने यासंदर्भात काही कठोर निर्णय घेतले आहेत.