सामान्य रूग्णालय उदगीर येथील दोघांना ५०० रूपयची लाच घेताना अटक

सामान्य रूग्णालय उदगीर येथील दोघांना ५०० रूपयची लाच घेताना अटक


उदगीर(प्रतिनिधी)- सध्या जगावर कोरोनाचे संकट असताना एकमेकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सध्याच्या परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे असताना माणसातील माणूसकी संपली कि काय असा प्रश्‍न निर्माण होत आहे. उदगीर येथील सामान्य रूग्णालयात एका अधिकार्‍याच्या सांगण्यावरून कर्मचार्‍यांने रूग्णवाहिकेवरील चालकास रूग्णवाहिकेची दुरुस्तीचे मागील बील व ओव्हर टाईमचा पगार काढण्यासाठी ५०० रूपयाची लाच मागतली यांनी फिर्यादी भगीरथ सुग्रीव गायकवाड याच्या तक्रारीनुसार  सापळा रचून लाचलुचपथ पथकाने लाच घेताना दोघांनाही रंगेहात  पकडले.
सामान्य रूग्णालय,उदगीर येथील आरोग्य विभागात रूग्ण वाहिकेवर भगीरथ सुग्रीव गायकवाड हा चालक यापदावर कार्यरत आहे. त्याच्या तक्रारीनूसार आरोपी नटवरसिंग वनसिंग तडवी वय ३० वर्षे पद रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी वर्ग ३ व शिवराज त्र्यंबकराव धानुरे हे सामान्य रूग्णालय उदगीर येथे सहाय्यक अधिक्षक वर्ग-३ या पदावर कार्यरत असून ते भगीरथ गायकवाड यास मागील कांही महिन्यापासून रजा, ओव्हरटाईमचे बील काढणे, रूग्णवाहिकेचे किरकोळ दुरुस्तीचे बील काढण्यासाठी आर्थीक लाभापायी बील वेळेवर न काढणे अशा प्रकारचे सतत त्रास देत होते. त्यांना वारंवार विनंती करून हि ते वेगवेगळ्या कारणाखाली त्याच्यावर आरोप करत असत. फिर्यादी भगीरथ सुग्रीव गायकवाड याचे रूग्णवाहिकेचे किरकोळ दुरुस्ती बील नोव्हेंबर २०१९ पासून थकीत होते यामुळे यांच्या त्रासाला कंटाळून लाचलुचपत विभागास तक्रार केली.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, दि. ९ एप्रिल २०२० रोजी संबंधीत लेखा विभागातील कर्मचारी धानुरे यांना भेटून भगीरथ गायकवाड याने त्याच्या बीलाच्या अनुशंगाने विचारणा केली असता तुमच्या रूग्णवाहीकेचे बील मंजूर झाले आहे बाकीचे बील आणखी ट्रेझरीला दाखल केलेले नाही. तुमचे ओव्हर टाईम कामाचे तसेच वैद्यकिय रजेचे बील ट्रेझरीला दाखल करायचे असेल व रूग्णवाहीकेचे दुरुस्ती बीलाचे चेक द्यायचे असेल तर २००० रूपयाची मागणी केली. पण भगरीथ गायकवाड यास लाच द्यायची नव्हती यामुळे त्याने दि.१३ एप्रिल २०२० रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,लातूर ईमेवर तक्रार दिली होती त्यानुसार दि.१५ एप्रिल रोजी पोलीस उपअधिक्षक बेद्रे यांनी सुमारे १२.२० वा. उदगीर ते लातूर रोडवरील उदगीर पासून थोड्याअंतावर फोन करून बोलावून घेऊन शाकीय वाहनात बसवुन त्यास पोलिस निरीक्षक काकडे व सापळा पथकातील सदस्य व पंचाची ओळख करून देवून पोलिस निरीक्षक काकडे यांनी शहानिशा केल्यानंतर सापळा रचून भगीरथ गायकवाड व पोना सुरवसे यांनी दु.१३.३६ वा.सामान्य रूग्णालय येथे तिसर्‍या मजल्यावर लेखा विभागात गेले असता धानुरे व तडवी हे हजर होते त्यांची पंचासमक्ष भेट घेऊन भगीरथ गायकवाड यांच्या कामाच्या अनुषंगाने त्याच्याशी चर्चा करून आपले कामाचे विचारणा केली असता त्यावेळी कर्मचारी धानुरे यांनी तुमचा अम्ब्युलन्स दुरुस्तीच्या बीलाचा चेक तयार आहे घेऊन जावा त्यावर गायकवाड यांनी वैद्यकीय रेजेचे व ओव्हर टाईमचे बिला बाबत विचारणा केली असता तडवी यांनी बजेट नसल्याने दाखल केले नसल्याचे सांगितले त्यानुसार धानुरे यांनी बील तयार आहे काय ते ट्रेझरीचा दक्षणा द्यावा लागतो त्यावर किती द्यावे लागते असे विचारणा केली असता तडवी यांनी तुमच्या बीलासाठी ५०० रूपये द्यावे लागतील असे म्हणाले. यावर भगीरथ गायकवाड यांनी पैसे घेवून येतो असे सांगून पोलीस निरीक्ष काकडे यांनी रेकॉर्डींगमधील धानुरे, तडवी व गायकवाड यांच्यातील संभाषणाची शहानिशा करून पुढील यत्रणा लावली व ५०० रूपये नोटेला अन्थासीन पावडरचा लावून भगीरथ गायकवाड याच्या सोबत दोन्ही पंच क्रं.१ बिरादार व पंच क्रं.२ बामणे हे सापळा रचून शसाकीय रूग्णालय येथे जाऊन आरोपी धानुरे व तडवी यांना कामा बाबत चर्चा करून भगीरथ गायवाड याने माझे तेवढे बील लवकर काढा की असे म्हणाले असता कार्यालयात धानुरे व तडवी यांनी बजेट पडलकी टाकतो, ते वैद्यकीय रजेचे तेवढे आठ दिवसात निघेल म्हणाले असता गायकवाड याने लवकर करा की म्हणाला असता धानुरे यांनी त्यांच्याकडील रूग्णवाहिका दुरुस्तीच्या बीलाचा रू.२४५६ चेक काढून गायकवाड यास देऊन हाताच्या इशार्‍याने लाचेची मागणी केली असता गायकवाड यांनी अन्थासीन पावडरयुक्त ५०० रूपये लाचेची रूक्कम काढून कर्मचारी धानुरे यांच्या समोर धरली असता हाताच्या इशार्‍याने तडवी यांच्याडे देण्यास सांगितले असता गायकवाड यांनी तडवी याच्याकडे दिली व त्यांची लाचेची रक्कम खिशात ठेवली असता लाचलुचपत विभागाने धानुरे व तडवी यास ताब्यात घेतले.
तरी लेकसेवक नटवरसिंग वनसिंग तडवी वय २० वर्षे पद रक्पेडी वैज्ञानिक अधिकारी वर्ग ३ सामान्य रूग्णालय,उदगीर व शिवराज त्र्यंबकराव धानुरे वय ५७ वर्षे पद सहायय्क अधिक्षक नेमणुक सामान्य रूग्णालय,उदगीर रा.लातूर यांनी चाचेची मागणी करून सदर लाचेची रूक्कम तडवी यांना प्रोत्साहन दिलेले आहे म्हणून दोन्ही आरोपी विरूध्द कायदेशीर कार्यवाही पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पोलीस उपअधिक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे,लातूर यांनी पुर्ण केली.