उदगीर मध्ये मास्क न लावता फिरल्यास न.प. प्रशासनाच्या वतीने प्रत्येकी रू. २००  दंड  



उदगीर मध्ये मास्क न लावता फिरल्यास न.प. प्रशासनाच्या वतीने प्रत्येकी रू. २००  दंड  
 उदगीर -कौळखेड येथील सर्व रूणाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे सध्या उदगीरकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तरीही उदगीरच्या सर्व नागरीकांनी सतर्कतेची काळजी घ्यावी  कोणीही कामा शिवाय विणाकारन घरच्या बाहेर पडू नये असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. किराणा, भाजी, फळे, औषधे व दवाखान्यासाठी बाहेर पडताना तोंडाला मास्क आवश्य लावावे व  कमीत कमी ३ते ५ फुटाच्या अंतराने खरेदी करावे. मुख्य रस्ते व चौका चौकात पोलिस उभे आहेत या मुळे वाहतुक गल्लीबोळातून फिरत असल्यामुळे कांही परीसरात सतर्कता बाळगून  कांही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आली आहेत यापुढेही सर्वांनी काळजी घ्यावी.
मात्र नागरीक गंभीर होत नसून चार चाकी, ट्रक,एका दुचाकीवर ३ जन विना मास्क फिरत आहेत यामुळे न.प. प्रशासनाच्या वतीने प्रत्येकी रू. २००  दंड  आकारण्यास सुरु केले आहे. आज देगलूर रोड येथे न.प. च्या कर्मचाऱ्याच्या वतीने रस्त्यावर विना मास्क फिरत असल्यामुळे रू. २००  दंड आकारण्यात येत आहे. तरी सर्व नागरीकांनी तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडावे.