उदगीर मध्ये पहिली कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण 

उदगीर मध्ये पहिली कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण 



उदगीर - उदगीर मध्ये कोरोना पॉझेटिव्ह आल्यामुळे उदगीरकरांना आता  लॉक डाऊनचा सामना करावा लागणार की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  जुन्या उदगीर मधील ती 65 वर्षीय महिला गुजरात येयून आली असून शासकीय रुग्णालय येथे तीन दिवसापासून अॅडमीट आहे. त्या महिलेचा आज रिपोर्ट पॉझेटिव्ह आला असून सुरक्षित असलेले उदगीर आता डेंजर झोन मध्ये गेले आहे.
तरी उदगीरकरांना यापुढे बाहेरचा प्रवास अथवा शहरात विनाकारण फिरता येणार नाही. आज संध्याकाळपर्यंत तात्काळ अत्यावशक किराणा, भाजी, औषधे खरेदी करून पुढील किमान पुढील एक माहन्याच्या तयारीत रहावे. 
पुढील तपास सुरू असून संध्याकाळ पर्यंत पूर्ण रिपोर्ट येईल.  
मात्र असे लोक येतात कसे? असा प्रश्न नागरिकांतून निर्माण होत आहे. न. प. प्रशासन व पोलिस मात्र सामान्याकडून दिवसा ढवळ्या दंड वसूल करत आहे. शहरामध्ये कांही भाग संवेदनशिल असून पोलिसांचे पहारे फक्त मुख्य रस्त्यावरच दिसत आहेत. संवेनशील परिसरातील सावळ्या गोंधळाची माहीती कांही जाणकार लोकांकडून प्रशासनाला देऊन ही कुठल्याही वादात न पडण्याची भूमिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी घेत आहेत यामुळे अशा लोकांना चांगलाच वाव मिळत आहे. प्रशासन व पोलिस खात्याने यापुढे संवेनशील परिसरात जास्त फेऱ्या मारणे गरजेचे आहे अशी चर्चा नागरीकातून होत आहे.