लोकजागृती फाउंडेशन - " गुप्त दान श्रेष्ठ दान '' च्या वतीने एका वयोवृद्ध कुटुंबास एक महिन्याच्या अन्नधान्याची मदत
उदगीर ( प्रतिनीधी ) -सध्या संपूर्ण जगात कोरोना महामारीचे संकट आहे.आपणाला शासनाने दिलेले ३ मे पर्यंत लॉक डाऊनचे नियम पाळणे गरजेचे आहे व आपण सर्वजण घरीच राहुया. लॉक डाऊन आणखी १५ दिवस वाढल्यामुळे आपल्या शहरात व परीसरात गोरगरीब लोक काम नसल्यामुळे आर्थिक संकटाचा व उपासमारीचा सामना करत आहेत. त्यांना सध्या आर्थीक, अन्न धान्याची व भाजी, दूध , औषधे,फळांची आवशकता आहे. आतापर्यंत बऱ्याच दानशुर व्यक्ती, संस्थांनी पुढाकार घेतला आहे.
शुभ मंगलम् बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, उदगीर व्दार संचलित लोकजागृती फांउडेशनच्या वतीने " गुप्त दान श्रेष्ठ दान '' . यामध्ये आपण सहभाग घ्यावा असे आवहान करण्यात आले होते.या आव्हानाला प्रतिसाद देत अॅड. देवीदास साबणे, गुरूनाथ पाटील बनशेळीकर, अनिल साबणे यांनी पुढाकार घेऊन आर्थिक देणगी दिली. त्यांनी दिलेल्या देणगीतून कौळखेड येथील श्री शिवदत्त मंदिराचे गुरुलिंग स्वामी यांच्या पुढाकाराने मांदिरा शेजारी एक वयस्कर मुस्लिम कुटुंब राहात असुन त्यांची मुले बाहेर राहत असल्यामुळे त्यांची देखभाल करणारे कोणीही नाही . श्री शिवदत्त मंदिराचे गुरुलिंग स्वामी हे त्यांना वेळोवेळी मदत करत असतात पण अन्नधान्य कमी पडत असल्यामुळे त्यांना आणखी अन्नधान्याची आवश्यकता होती. गुरुलिंग स्वामी यांनी लोकजागृती फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पत्रकार महादेव घोणे यांना त्या कुटुंबाची अडचण सांगितल्यामुळे तात्काळ एक महिन्याचे अन्नधान्याची सोय करून देण्यात आले तसेच किराणा घेत असताना दोन वयोवृद्ध महिला त्यांच्या कुटुंबासाठी मिळेल ते अन्नधान्य , भाजी, फळाची मदत मागत होते त्यांना पण एक किलो तांदूळ देण्यात आले.
तरी लोकजागृती फांउडेशनच्या वतीने " गुप्त दान श्रेष्ठ दान '' . यामध्ये आपण सहभाग घ्यावा असे आवहान ती फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.