महात्मा बसवेश्वर जयंती घरात साजरी करावी आसे आव्हान चंद्रकांत वैजापूरे यानी केले
उदगीर / प्रतिनिधी-लिंगायत धर्माचे संस्थापक जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची 915 वी जयंती रविवारी दिनांक 26 एप्रिल 2020 रोजी असून कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यंदा जयंती घरातच साजरी करावी असे आव्हान करण्यात आले आहे उदगीर शहरात मोठ्या थाटामाटात व आंनदात प्रतिवर्षीप्रमाणे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती निमित्त . विविध सार्वजनिक कार्यक्रमाचे व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते मात्र यंदा कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडान आसल्याने कोणतेही सर्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम होणार नसल्याने रविवारी बसव भक्तांनी ही जयंती आपल्या आपल्या घरातच पूजा प्रार्थना पाळणा वचन साहित्याचे वाचन करून साजरी करावी असे आव्हान महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती व वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे यांनी केले आहे