लातूरातील परप्रातीय ८ कोवीड - १९ रुग्णापैकी ७ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह, दुसरी तपासणीही निगेटीव्ह आल्यास त्यांना त्यांच्या मुळ गावी पाठविणार
लातूर कोरोनामुक्त आहे, पूढेही सुखरूप ठेवण्यासाठी एकसंघपणे लढू
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख
लातूर (प्रतिनिधी) :
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्था येथे उपचार घेत असलेलया आध्रप्रदेशातील कोवीड – १९ बांधीत ८ रुग्णापैकी ७ जणाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. लातूरकरांच्यादृष्टीनेही ही अत्यंत समाधानाची बाब आहे. यातील उपचार नियमानुसार २४ किंवा ४८ तासानंतर त्या रूग्णाची आणखी एक टेस्ट घेण्यात येईल ती निगेटिव्ह आल्यास त्यांना त्यांच्या आध्रप्रदेशातील कर्नुल जिल्हयात त्यांच्यावर नंदयाल या मुळ गावी पाठविण्यात येईल अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख दिली आहे.
या संदर्भाने बोलतांना लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगतिले की, अदयाप पर्यंत लातूर जिल्हयात स्थानिकचा एकही कोवीड – 19 पॉझिटीव्ह रुग्ण सापडलेला नाही. उत्तरेकडील हरियाणा राज्यातुन आध्रप्रदेशातील कर्नुल जिल्हयात जात असतांना बारा जणंना अडविण्यात आले व त्यांची तपासणी केली असता त्यापैकी ८ जण कोवीड – १९ पाझीटीव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेत १४ दिवस उपचार करण्यात आले आहेत. यशस्वी उपचारानंतर त्यांना त्यांच्या गावी पाठविण्यात आल्यास परराज्यातील रुग्णामुळे तांत्रीकदृष्टया जो लातूर जिल्हया कोवीड – १९ बाधीत दाखविला जात होता तो अधिकृतरीत्या कोवीड – १९ मुक्त होईल.
परराज्यातील रुग्णांवर यशस्वी उपचार केल्या बद्दल विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन विज्ञान संस्थेतील अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर व त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर, नर्स, मेडिक्स, पॅरामेडिकल स्टाफ व स्वच्छता कर्मचारी या सर्वांचे मी कौतुक करतो आहे. या सर्वांनी ही परिस्थिती व्यवस्थित हाताळल्या बद्दल मी त्यांचे अभिनंदन करीत आहे. भविष्यातही त्यांच्याकडून अशाच काम होईल अशी अपेक्षा मी करतो आहे असे पालकमंत्री यांनी म्हटले आहे. लातूर जिल्ह्यात कोविड – 19 चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लढणाऱ्या सर्वच प्रशासकीय, पोलिस व आरोग्य यंत्रणा तसेच विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, तसेच जिल्हयातील सर्व जनता यांनी सुरूवातीपासूनच जारूक राहून दक्षता घेतली. सामाजिक अंतर पाळले त्यामुळे जिल्हा कोवीड – 19 पासून सुखरूप राहिला आहे यापूढेही आपला जिल्हया असाच सुखरूप ठेवायचा आहे त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे, याकामी मी आणि माझे सर्व सहकारी आपल्या सोबत अहोत. आपणाला लागणारी सर्व मदत तत्परतेने पाहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल शासनाची मदत आणि सुचना आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी तत्परतेने प्रयत्न केले जातील. असे सांगून आपण सर्वजण एकसंघ राहून कोवीड – १९ विरूध्दचा हा लढा जिंकूया असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
--------------------------------------------