निलंग्यातील त्या 8 कोरोना ग्रस्तांचे जालना कनेक्शन
कोरोना पॉझिटिव्ह मरकजवाल्यांना घरी आणून पाजला चहा, 3 कुटुंबातील 25 जणांना संसर्ग होण्याचा धोका
उदगीर - : दिल्लीच्या निजामुद्दीन तबलिगी मरकज जमातच्या कोरोना पोजिटिव्ह हरियाणा येथून फक्त निलंग्यात आले नसून या काळात आणखी कोठे कोठे गेले होते हे शोधने गरजेचे आहे. असे किती कुटुंब, मशजीद संपर्कात आलेल्या असतील. जालना जिल्ह्यातील शहागड येथील 25 संशयितांना मध्यरात्री पोलिसांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले असून त्यांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे
आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आलेले सर्व संशयित जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शहागड येथील रहिवासी आहे. या कुटुंबीयांनी लातूर येथे पॉझिटिव्ह सापडलेल्या दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज तबलिक जमातच्या सदस्यांना घरी बोलावून चहा पाजला होता. त्याचवेळी या 3 कुटुंबातील हे 25 जण त्यांच्या संपर्कात आले होते.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने मध्यरात्री या सर्वांना अॅम्ब्युलन्सद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या सर्व संशयितांना आयसोलेशन वार्डात दाखल करून स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुदैवाने जालना जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. मात्र या संशयितांचा तबलिगी कनेक्शनमुळे जालनेकरांची धाकधूक वाढली आहे.
या सर्व संशयित रुगणाच्या वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच त्यांना पण कोरोनांची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधीच या घटनेमुळे जालनाकरांची चिंता काहीसी वाढली आहे.