उदगीरचे भवितव्य त्या रिपोर्टवरच
उदगीर -कौळखेड येथील सर्व रूणाचे रिपोर्ट निगेटिव्ह का पॉझेटिव्ह याची उदगीर तालुक्यातील प्रशासन, नागरिक वाट पाहात आहेत. आजच्या रिपोर्टवर स्थिती अवलंबुन असून उदगीरचे आरोग्य व पोलिस प्रशासन सज्ज आहे. याच सोबत उदगीरच्या सर्व नागरीकांनी सतर्कतेची काळजी घ्यावी कोणीही कामा शिवाय विणाकारन घरच्या बाहेर पडू नये असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे. किराणा, भाजी, फळे, औषधे व दवाखान्यासाठी बाहेर पडताना तोंडाला मास्क आवश्य लावावे, कमीत कमी ३ते ५ फुटाच्या अंतराने खरेदी करावे. मुख्य रस्ते व चौका चौकात पोलिस उभे आहेत या मुळे वाहतुक गल्लीबोळातून फिरत आहे. याची सतर्कता बाळगून कांही ठिकाणी रस्ते बंद करण्यात आली आहे.
उदगीर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या महामारीचे संकट जगावर सावटले आहे. देशात लॉकडाऊन गेल्या २५ मार्च २०२० पासून आता ३ मे २०२० पर्यंत सुरु राहणार आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जे लोक ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी रहावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले व सर्व देशात कर्फ्युची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य जनजिवन ठाप्प झाले असून दैनंदिन व्यवहार सुध्दा थांबला आहे. महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यभर जिल्हा बंदी आदेश लागू केल्यामुळे एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाण्यास बंदी आहे यामुळे लोक जेथे आहेत तेथेच थांबल्यामुळे सध्या सर्वांना जीवनावश्यक गरजांचा समाना करावा लागत आहे. तरीही सरकार सर्वांच्या जेवनाची व राहण्याची व्यवस्था केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या सर्व उपाययोजना केले असतानाही कांही लोक गावाची ओढ लाडल्याने वेगवेगळ्या मार्गाने गावी परतन्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे आतापर्यंत ज्या जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळले नाही व जिल्हा कोरोनापासून सुरक्षित आहे तेथे आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. असा प्रकार उदगीर येथील मौ.कौळखेड येथे मुंबईहून आलेल्या एकाच कुटुंबातील ५ व्यक्ंतीमुळे संपूर्ण जिल्ह्यास धोका निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
संचारबंदी व जिल्हाबंदी आदेश लागू असताना या आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रताप उदगीर तालुक्यातील कौळखेड येथील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींनी केला आहे. याच जाणांविरूधात उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात कोविड-१९ उपाय योजना साठीचे रोग प्रतिबंधिक अधिनियम व आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना आरोग्य तपासणीसाठी उदगीरच्या शासकीय रूग्णालायत दाखल करण्यात आले. जिल्हाबंदी व विविध आदी नियम व प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणारे हे पाचहीजण मूळचे उदगीर तालुक्यातील मौ.कौळखेड येथील रहिवाशी असून ते कामानिमित्त मुंबईतील बांद्रा ईस्ट येथे वास्तव्यास होते पण हे पाचहीजण शासनाने लॉकडाऊन,संचारबंदी व जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करून १ एप्रतिल ते १३ एप्रिलच्या दरम्यान आपले मुळ गाव कौळखेड गाठले असून याची कुणकुण प्रशासनाला लागताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी त्यांना सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गु.र.न.१३२/२० कलम १८८,२६९ भादवि.व कोविड १९ उपाययोजना निमय ११ साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम १८५७ कमल २,३,४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या उदगीर तालुका सुरक्षित असताना किरोकोळ कार्यवाही वगळता दैंनदिन जीवन सुरुळीत होते. पण या लोकांमुळे संपूर्ण लातूर जिल्हा हादरला असून या पाच पैकी एकास त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे यामुळे आज या पाचही जणांचा रिपोर्ट आल्यानंतरच उदगीर मधील कायदा सुव्यवस्थेत काय बदल होईल सांगता येत नाही. मिळालेल्या माहितीनुसार आरोग्य व पोलिस यंत्रणेकडून संपूर्ण तयारी झाली असून सामान्य रूग्णासोबतच कांही खाजगी हॉस्पिटल, आश्रम शाळा, शासकीय वस्तीगृह ताब्यात घेण्यात आले व संपूर्ण कौळखेड परीसरातील लोकांची तपासणी करण्यासाठी तत्पर आहे असे सागंण्यात आले आहे.