लाल बहादूर शास्त्री शैक्षणिक संकुलाच्या वतीने 194 कुटुंबांना अन्न धान्याचे किट (शिधा संच) वाटप
उदगीर(वार्ताहर) : कोरोना(कोविड-19)या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाउन-2 ची मुदत 3 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. या काळात अनेक वंचित कुटुंबांची हेळसांड होत आहे.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने मा. पंतप्रधानांच्या आवाहनास प्रतिसाद देत व समाजातील भटके-विमुक्त, अनाथ, निर्वासित कामगार व दिव्यांग कुटुंबांची विशेष समस्या लक्षात घेऊन उदगीरच्या लाल बहादूर शास्त्री शैक्षणिक संकुलाच्या वतीने उदगीर तालुक्यातील 194 आर्थिक दुर्बल दिव्यांग कुटुंबांना अन्न धान्याचे किट (शिधा संच) देण्याचा संकल्प केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती द्वारा संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व लाल बहादूर शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बंधू भगिनींना जीवनावश्यक वस्तूंच्या किमान संचाचे (शिधा किट) ज्यात गहू पीठ 10 किलो, तांदूळ 5 किलो, तेल 1 किलो, मीठ 1 किलो, तूरडाळ 2 किलो, मिरची पावडर 250 ग्राम, जिरे-मोहरी प्रत्येकी 50 ग्राम, कपडे साबण 3 नग, अंगाचे साबण 3 नग, साखर 1 किलो आदी साहित्याचा समावेश आहे.
उदगीर तालुक्यातील एकूण 194 दिव्यांग व्यक्तींची यादी संस्थेला प्राप्त झाली असून लाल बहादूर शास्त्री शैक्षणिक संकुलतील शिक्षक कर्मचारी, माजी शिक्षक, पालक, संस्था पदाधिकारी व माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहेत. या कार्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह . नितीन शेटे, सहकार्यवाह , चंद्रकांत मुळे, स्थानिक अध्यक्ष मधुकर वट्टमवार, कार्यवाह शंकरराव लासुने व मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभत आहे.