राज्यात आजवर 156 तबलिगींवर कारवाई

राज्यात आजवर 156 तबलिगींवर कारवाई





दिल्लीतील निजामुद्दीन मरकज येथे तबलिगी जमातीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतही 15 आणि 16 मार्च रोजी हा कार्यक्रम होणार होता. महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला त्यांना परवानगी दिली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने ही परवानगी नाकारण्यात आली होती. नगरमध्येही तबलिगींचा कार्यक्रम होणार होता. मात्र, त्यालाही परवानगी नाकारण्यात आली होती. यानंतरही दिल्लीतील कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमानंतर संबंधित व्यक्ती देशभर फिरल्या. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. यांतील एक हजार 400 तबलिगींचा शोध प्रशासनाने घेतला असून, 156 जणांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.