रसिक-प्रेम स्मृती जिव्हाळा महिला गौरव पुरस्कार जाहीर
पंडित,सरदार,पटवारी यांचा होणार गौरव
उदगीर-- येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने देण्यात येणारे रसिक-प्रेम स्मृती जिव्हाळा महिला गौरव पुरस्कार बुधवारी जाहीर करण्यात आले.
येत्या 8 मार्च रोजी महिलादिनी या पुरस्काराचे वितरण गोदावरी खोरे विकास मंडळाचे माजी उपाध्यक्ष नागनाथ निडवदे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ. बी. टी. लहाने यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पुरस्कार निवड समितीचे सदस्य विश्वनाथराव माळेवाडीकर, विक्रम हलकीकर, विवेक होळसंबरे या त्रिसदस्यीय समितीने मुख्याध्यापिका तृप्ती सुधीर पंडित,शिक्षिका सुनंदा अशोकराव सरदार,सुवर्णा संजय पटवारी या संघर्षमय जीवन जगणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची निवड केली आहे.
पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी यांच्या मातोश्री रसिकाबाई कुलकर्णी व पत्नी प्रेमला कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार जागतिक महिला दिनी दिले जातात. या पुरस्काराचे वितरण 8मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता उदगीर-निडेबन येथील डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन जिव्हाळा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ मुडपे, अध्यक्ष देविदास नादरगे, संयोजक व्ही. एस. कुलकर्णी ,डॉ.अनिल भिकाने यांनी केले आहे.