राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांना भारतरत्न मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार
लिंगायत सत्संग भवनसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर- राज्यमंत्री बनसोडे
उदगीर (ता.प्र.) राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे. महाराजांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे रविवारी ९६ वा सत्संग सोहळा उदगीर येथील परमेश्वरी मंगल कार्यालय संपन्न झाले. याप्रसंगी सार्वजनिक व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी महाराजांचा १०४ वा जन्मोत्सवानिमित्त सत्कार करून आशीर्वाद घेतला. याप्रसंगी सत्संग मंडळाच्या वतीने डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांच्या हस्ते बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना राज्यमंत्री बनसोडे यांनी, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या आशीर्वादाने उदगीर विधानसभा मतदारसंघातून निवडून येवून मंत्रीही झालो. मंत्रिपदाच्या या दोन महिन्याच्या काळात मतदारसंघात एमआयडीसी, प्रशासकीय इमारत, रेल्वे उड्डाणपूल, आष्टामोड ते उदगीर रस्ता सह उदगीरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. उदगीर येथे लिंगायत सत्संग भवनासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे यावेळी जाहीर केले. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे जिवन हे समाजासाठी समर्पित असून त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात यावे याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मतदार संघाच्या विकासासाठी व अधिकाधिक कामे करण्यासाठी महाराजांचे आशिर्वाद लाखमोलाचे असल्याचे बनसोडे यांनी सांगितले. यावेळी डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी आपल्या आशिर्वचनात, राज्यमंत्री बनसोडे यांनी सत्संग भवनासाठी २ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून निर्माण होणाऱ्या या सत्संग भवनाच्या माध्यमातून समाजाचे वैचारिक प्रबोधन घडणार आहे. समाजाच्या विकासाचा विचार या सत्संगाच्या माध्यमातून होणार असे सांगून याप्रसंगी बनसोडे यांना अधिकाधिक समाजहिताचे कार्य करण्याकरिता आशिर्वाद दिले. प्रारंभी ९६ व्या सत्संगाचे आयोजक सौ. मनोरमा सत्यकांत थोटे परिवाराच्या वतीने पाद्य पुजन करण्यात आले. महाआरतीने सत्संगाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचलन शि.भ.प. शिलाताई मालोदे यांनी केले. सोहळा यशस्वीतेसाठी सत्संग मंडळाच्या महिलांनी परिश्रम घेतले.
यावेळी केलेल्या स्वरूपात झाले असून या माध्यमातून समाजाची वैचारिक प्रबोधन होणार आहे समाजाच्या विकासाचा विचार होणार असून फक्त समाजासाठी येणार नाही करण्यात आली